निती टेलर आपल्या व्यक्तिरेखेसाठी या गाण्यापासून घेते प्रेरणा !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 04:34 PM2019-02-18T16:34:56+5:302019-02-18T16:39:00+5:30
रॅपर बादशाह आणि अकुल व गुरू रंधावा यांसारखे गायक माझे आवडते आहेत. शॉट्सच्या दरम्यान मला त्यांची हिट गाणी ऐकायला आवडतात.
छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी अभिनेत्री निती टेलर स्टारप्लसवरील ‘इश्कबाज - प्यार की ढिंचॅक कहानी’ मधील मन्नत खुराणाच्या रूपात प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. मन्नत ही अतिशय हसरी खेळकर आणि चैतन्यमयी व्यक्तिरेखा आहे. आपल्या व्यक्तिरेखेला जीवंत करण्यासाठी नितीने शॉट्सच्या दरम्यान हाय-एनर्जी पंजाबी संगीत ऐकायला सुरूवात केली आहे.
निती म्हणाली, “मन्नत ही व्यक्तिरेखा अतिशय चैतन्यमयी आणि बडबडी अशी असून ती लोकांच्या समस्या सोडवते आणि त्यांची काळजी घेते. तिचे व्यक्तिमत्त्व अतिशय उत्साही आहे आणि एक अभिनेत्री म्हणून माझी व्यक्तिरेखा ऑनस्क्रीन जीवंत करणे हे माझे कामच आहे. मी मन्नतएवढी ॲनिमेटेड नाहीये त्यामुळे मी उडत्या चालीची पंजाबी गाणी ऐकते आणि त्यामुळे मला माझ्या व्यक्तिरेखेमध्ये शिरायला मदत होते. पंजाबी संगीतामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते आणि लोक आपोआप डोलायला लागतात. रॅपर बादशाह आणि अकुल व गुरू रंधावा यांसारखे गायक माझे आवडते आहेत. शॉट्सच्या दरम्यान मला त्यांची हिट गाणी ऐकायला आवडतात. त्यामुळे माझी एनर्जी लेव्हल आपोआप उंचावते. मला आशा आहे प्रेक्षकांना मन्नत आपलीशी वाटेल आणि त्यांना माझा ह्या शोमधील परफॉर्मन्स आवडेल.”
नितीचा आपल्या व्यक्तिरेखेमध्ये शिरण्याचा मार्ग निश्चितपणे अनोखा आहे. ती एक मेहनती अभिनेत्री असून ह्याआधीही तिने अशा प्रकारच्या भूमिका साकारलेल्या आहेत आणि आपल्या अभिनयाने लाखोंचे मन जिंकले आहे.