निवेदिता सराफ झाल्या नॉस्टेल्जिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 10:33 AM2017-09-20T10:33:35+5:302017-09-20T16:03:35+5:30

स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' मालिकेच्या टीमने नुकताच कोल्हापूरचा दौरा केला. त्यात निवेदिता सराफ यांच्यासह सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक यांचाही ...

Nivedita has been praised by Nostalgic | निवेदिता सराफ झाल्या नॉस्टेल्जिक

निवेदिता सराफ झाल्या नॉस्टेल्जिक

googlenewsNext
टार प्रवाहच्या 'दुहेरी' मालिकेच्या टीमने नुकताच कोल्हापूरचा दौरा केला. त्यात निवेदिता सराफ यांच्यासह सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक यांचाही समावेश होता. निवेदिता सराफ कोल्हापूरला जाऊन खूप खूश झाल्या होत्या. कारण निवेदिता आणि कोल्हापूर यांचे खूपच जवळचे नाते आहे. 
निवेदिता सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली आहे. निवेदिता सराफ यांनी केवळ मराठी नव्हे तर हिंदीत देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील एक दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
निवेदिता सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला 'धुमधडाका' तसेच त्यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे कोल्हापूरमध्ये चित्रीकरण केले होते. कोल्हापूरमधील अनेक परिसरात त्यांनी आजवर चित्रीकरण केले असल्याने त्यांना हे शहर त्यांच्या खूप जवळचे वाटते. 'दुहेरी' या मालिकेच्या टीमसोबत कोल्हापूरचा दौरा करताना त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. कोल्हापूरमध्ये चित्रीकरण करत असताना त्यांनी तिथे लायब्ररी देखील लावली होती. त्यावेळेच्या त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. तसेच तिथे केलेली खूप सारी भटकंती, महालक्ष्मी मंदिरातल्या मन शांत करणाऱ्या अनुभवापर्यंतच्या अनेक आठवणी या शहराशी जोडलेल्या आहेत. या कोल्हापूर दौऱ्यात ‘दुहेरी’ टीमने महालक्ष्मीचे दर्शन देखील घेतलं. महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराजवळ खूप सारी खरेदी देखील केली.
कोल्हापूरच्या या नॉस्टेल्जिक अनुभवाबद्दल निवेदिता सराफ सांगतात, 'आजवरचा माझा प्रवास कोल्हापूरपासूनच सुरू झाला. त्यामुळे कोल्हापूरचे माझ्या मनातले स्थान खूपच स्पेशल आहे. चित्रीकरणाच्या निमित्ताने सहा सहा महिने मी कोल्हापूरला येऊन राहायचे. तिथले जेवण, माणसं, माती सारंच अद्भूत आहे. तांबडा-पांढरा रश्श्याची चव तर वर्णनापलीकडे आहे. कोल्हापूरने मला खूप काही दिले आहे.'
सुहासिनी सूर्यवंशी (निवेदिता सराफ), दृश्यांत सूर्यवंशी (संकेत पथक) आणि सोनिया कारखानीस (सुपर्णा श्याम) या तीन व्यक्तिरेखांमधील नाते पुढे कसे उलगडते, हे प्रेक्षकांना दुहेरी या मालिकेतील पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

Also Read : ​दृष्यंत-निवेदिताची धमाल शॉपिंग

Web Title: Nivedita has been praised by Nostalgic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.