जबरा फॅन! निवेदिता सराफ यांच्या चाहतीने हातावर काढलाय अभिनेत्रीच्या नावाचा टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:17 IST2025-01-10T16:17:16+5:302025-01-10T16:17:34+5:30
निवेदिता सराफ यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. त्यांच्या अशाच एका चाहतीने निवेदिता सराफ यांच्या नावाचा टॅटू हातावर गोंदवून घेतला आहे.

जबरा फॅन! निवेदिता सराफ यांच्या चाहतीने हातावर काढलाय अभिनेत्रीच्या नावाचा टॅटू
निवेदिता सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. अभिनयाने त्यांनी ९०चं दशक गाजवलं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. निवेदिता सराफ यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. त्यांच्या अशाच एका चाहतीने निवेदिता सराफ यांच्या नावाचा टॅटू हातावर गोंदवून घेतला आहे.
आज निवेदिता सराफ यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीच्या चाहतीने खास पोस्ट शेअर केली आहे. निवेदिता सराफ यांच्या नावाचा टॅटू चाहतीने तिच्या डाव्या हातावर काढला आहे. २०२४ मध्ये तिने हा टॅटू काढला होता. "love Nivedita Saraf" असं टॅटूमध्ये लिहिलं आहे. ३ वर्षांपूर्वी २०२१मध्ये ती निवेदिता सराफ यांना भेटली होती. तेव्हा तिने त्यांची ऑटोग्राफ घेतली होती. त्या ऑटोग्राफचा टॅटू तिने काढला आहे. चाहतीने निवेदिता सराफ यांच्या वाढदिवासानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, निवेदिता सराफ सध्या छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत त्या मुख्य भूमिका साकारत आहेत. 'फसक्लास दाभाडे' या सिनेमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.