निवेदिता सराफ यांची नवी मालिका, प्रोमो पाहून प्रेक्षक उत्सुक, दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:02 AM2024-09-02T10:02:17+5:302024-09-02T10:03:17+5:30

निवेदिता सराफ नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

nivedita saraf new marathi serial aai ani baba retired hot ahet star pravah promo | निवेदिता सराफ यांची नवी मालिका, प्रोमो पाहून प्रेक्षक उत्सुक, दिसणार मुख्य भूमिकेत

निवेदिता सराफ यांची नवी मालिका, प्रोमो पाहून प्रेक्षक उत्सुक, दिसणार मुख्य भूमिकेत

निवेदिता सराफ या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'थरथराट', 'तुझी माझी जमली जोडी' अशा कित्येक सुपरहिट सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतही त्या दिसल्या होत्या. आता निवेदिता सराफ नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत निवेदिता सराफ दिसणार आहेत. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेतून निवेदिता सराफ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत त्या मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. मालिकेच्या प्रोमोमध्ये गृहिणी असलेल्या शोभा सकाळी उठल्यापासून घरातील कामाच्या गडबडीत दिसत आहेत. मुलांची आणि नवऱ्याची ऑफिसला जायची घाई आणि नातवंड यामध्ये त्यांची कसरत होताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पतीची कामातून आज निवृत्ती होणार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर ते दोघेही गावी जाण्याचा प्लॅन करत असल्याचं म्हणताना दिसत आहेत. 


या मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या मालिकांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेबरोबरच उदे गं अंबे उदे ही मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Web Title: nivedita saraf new marathi serial aai ani baba retired hot ahet star pravah promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.