अंकिता वालावलकर सेफ! पण इतरांना मिळाली मोठी Warning; बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 22:50 IST2024-09-01T22:50:11+5:302024-09-01T22:50:35+5:30
कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता वालवलकर घराबाहेर येण्याची घोषणा झाली पण... (bigg boss marathi 5, ankita walawalkar)

अंकिता वालावलकर सेफ! पण इतरांना मिळाली मोठी Warning; बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा पाचवा आठवडा सुरु आहे. पाचव्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर काल रितेशभाऊंनी सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. अरबाज पटेल, अंंकिता वालावलकर, पॅडी कांबळे, आर्या जाधव अशा अनेकांना रितेशभाऊंनी सुनावलं. अशातच आज बिग बॉस मराठीच्या घरात नवीन ट्विस्ट आला. या आठवड्यात वर्षा उसगांवकर, अंकिता, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत हे चौघेजण नॉमिनेट होते. त्यापैकी अंकिताचं घराबाहेर जाण्याची बिग बॉसने घोषणा केली. परंतु शोमध्ये पुढे ट्विस्ट असा आला की, अंकिता घराबाहेर न येता तिला पुन्हा घरात पाठवण्यात आलं.
अंकिता घराबाहेर गेल्यावर काय घडलं?
बिग बॉसच्या घरात आज पाचव्या आठवड्याची एलिमिनेशन प्रक्रिया पार पडली. यामध्ये अभिजीत, निक्की, अंकिता आणि वर्षा उसगांवकर यापैकी अंकिता वालावलकरचं नाव रितेशने घोषित केलं. अंकिता घराबाहेर जाण्याची घोषणा होताच धनंजय पोवार, अरबाज पटेल, आर्या जाधव अशा सर्वच सदस्यांना अश्रू अनावर झाले. पुढे अंकितासाठी मुख्यद्वार उघडलं गेलं. पण अंकिता घराबाहेर येताच बिग बॉसच्या दारावर पाटी लावली होती की, "इतरांना पाण्यात बघण्यापेक्षा स्वतःच्या गेमकडे लक्ष द्या".
अंकिताचं eviction नाही
अंकिता वालावलकर घराबाहेर आल्याने सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. अंकिताने जाताना सर्वांना मिठी मारली. पण बिग बॉसने अंकिताला बाहेर पाठवण्याचं फक्त नाटक केलं असल्याने ती पुन्हा घरात आली. त्यामुळे DP दादाला खूप आनंद झालेला दिसला. पण रितेशभाऊने सगळ्यांनाच स्वतःचा गेम सुधारण्याची Warning दिली. आता उद्यापासून घरात सहावा आठवडा सुरु होणार आहे. उद्या पहिल्याच दिवशी घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.