'आपण कितीही मोठे झालो तरी....', कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 11:22 AM2022-11-02T11:22:38+5:302022-11-02T11:23:13+5:30
Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून घराघरात पोहचला आहे.
अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमातून घराघरात पोहचला आहे. आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले. त्याच्या चाहत्यांच्या संख्येतही खूप वाढ झाली आहे. कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून तो फोटो आणि पोस्ट शेअर करत असते. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर फटाक्यांसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, ही एक खोडी मला बालपणापासून आहे, वात नसलेले आणि न पेटलेले “फटाके” गोळा करायचे आणि त्यातली दारू एकत्र करुन पेटवून द्यायची. त्याशिवाय माझी दिवाळी कधीच पूर्ण झाली नाही.
त्याने पुढे म्हटले की, आज इतकी वर्ष गेली पण माझी ही सवय काही गेली नाही. मला वाटतं, दिवाळीचा फराळ संपल्यानंतर डब्बे नीट तपासून पाहिले तर तुकड्या तुकड्यात “चकली, शंकरपाळ्या” सापडतात ना! डब्याच्या तळाशी “करंजीचं सारण आणि अनारस्याच्या खसखस” मध्ये मिसळलेला जरासा “चिवडा” सापडतोच ना! तसंच आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यात उरलेलं थोडसं “बालपण” आपल्याला सापडतच !! फक्त डबे नीट तपासून घ्यायला हवेत, तळाशी कुठेतरी असतच हे “बालपण”
“अगदी लाडवातल्या “मनुक्या” एवढ का होईना, ते आपल्यात उरतच”
कुशल बद्रिकेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ‘चला हवा येऊ द्या’च्या (Chala Hawa Yeu Dya) माध्यमातून तो घराघरात पोहोचला. या कार्यक्रमाव्यतिरिक्त त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच तो पांडू या चित्रपटात झळकला होता. तसंच लवकरच तो 'जत्रा २' मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.