नोरा फतेहीने टीव्ही शोमध्ये केलं रूमर्ड बॉयफ्रेन्ड गुरू रंधावाला किस, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 15:22 IST2022-01-01T14:20:27+5:302022-01-01T15:22:35+5:30
Nora Fatehi : या आठवड्यात शोमध्ये ते त्यांचं नवीन गाणं 'डान्स मेरी राणी' (Dance Meri Rani) चं प्रमोशन करतील. यादरम्यान असं काही झालं की, नोराने तिच्या आणि गुरू रंधावाच्या अफेअरच्या चर्चेला आणखी हवा दिली.

नोरा फतेहीने टीव्ही शोमध्ये केलं रूमर्ड बॉयफ्रेन्ड गुरू रंधावाला किस, व्हिडीओ व्हायरल
'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) च्या नव्या प्रोमोमध्ये गायक गुरू रंधावा (Guru Randhawa) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) दिसले. या आठवड्यात शोमध्ये ते त्यांचं नवीन गाणं 'डान्स मेरी राणी' (Dance Meri Rani) चं प्रमोशन करतील. यादरम्यान असं काही झालं की, नोराने तिच्या आणि गुरू रंधावाच्या अफेअरच्या चर्चेला आणखी हवा दिली.
कपिल शर्माने नोरासोबत बोलताना गुरूची गंमत केली आणि म्हणाला की, 'आधीच्या व्हिडीओ तू हिला रोबोट बनवलं, या व्हिडीओत जलपरी. खरं सांग मनात काय बनवायचं आहे? यावर गुरू हसत म्हणाला, याचं उत्तर मी पुढच्या शोमध्ये देणार'.
नोराला कपिलने विचारलं की, 'नाच मेरी राणी'नंतर गुरूच्या डान्समध्ये काही सुधारणा आली का? यावर ती म्हणाली की, तो माझ्यासोबत असेल तरच डान्स करतो, माझ्याशिवाय नाचू शकत नाही. इतर म्युझिक व्हिडीओमध्ये तो केवळ हातांचे इशारे करतो.
गुरू रंधावा यावर म्हणाला की, 'तू किती मतलबी आहे'. यावर नोरा त्याला लगेच गालावर किस करते. मग लगेच कपिल म्हणाला की, कोणत्या मुलाला हर्ट करण्यासाठी गुरूला किस केलं का? नोरा यावर लगेच हो म्हणते.
दरम्यान नोरा आणि गुरू रंधावा काही दिवसांपूर्वी समुद्र किनारी क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसले होते. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा होऊ लागली होती. लोकांनी त्यांना सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत प्रश्न विचारले आहेत.