आशियातील सर्वाधिक SEXY ठरली होती ही अभिनेत्री, दीपिका प्रियंकालाही टाकले होते मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 10:31 AM2020-04-27T10:31:15+5:302020-04-27T10:33:48+5:30

पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील 'इस्टर्न आय' या मॅगझिनने ही 50 'सेक्सिएस्ट एशियन वूमन'ची यादी जाहीर केली होती.

Not Deepika & Priyanka Nia Sharma has been sexiest woman in Asia-SRJ | आशियातील सर्वाधिक SEXY ठरली होती ही अभिनेत्री, दीपिका प्रियंकालाही टाकले होते मागे

आशियातील सर्वाधिक SEXY ठरली होती ही अभिनेत्री, दीपिका प्रियंकालाही टाकले होते मागे

googlenewsNext


‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. निया  नेहमी सोशल मीडियावर तिचा हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नियाचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपली फोटोंवरील पसंती दर्शवत असतात. नुकताच नियाने हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये निया खूपच हॉट दिसतेय. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

विशेष म्हणजे 2017 मध्ये 'सेक्सिएस्ट एशियन वूमन'च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील 'इस्टर्न आय' या मॅगझिनने ही 50 'सेक्सिएस्ट एशियन वूमन'ची यादी जाहीर केली होती.

नेहमीच ती वेगळ्या वेगळ्या ड्रेसिंगमुळे ट्रोलही होत असते. निया शर्माने वेब सीरिजमध्ये आपला ग्लॅमरस अंदाज दाखवला होता. नियाच्या वेब सीरिजची चर्चा ही तिने केलेल्या लेसबियन लिपलॉक सीनमुळे सुद्धा प्रचंड झाली होती. नियाने या वेब सीरिजमध्ये आपली सह अभिनेत्री ईशा शर्माला लिपलॉक केलं होतं. नियाचं लेटेस्ट फोटोशूट समोर आलं होतं ज्यामध्ये नियाने ट्रान्सपरंट कॉस्ट्युम परिधान करत टॅन लूक दिला होता. नियाच्या या लूकला चाहत्यांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला होता. 

Web Title: Not Deepika & Priyanka Nia Sharma has been sexiest woman in Asia-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.