पोपटलाल नाही तर वयाच्या ४७ व्या वर्षीही तारक मेहताचा हा कलाकार आहे अविवाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 16:10 IST2022-01-08T16:10:10+5:302022-01-08T16:10:41+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार मालिकेत लग्नासाठी उतावीळ असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र काही केल्या त्याचे लग्न होत नाही. पण त्याचे लग्नासाठी स्थळं शोधण्याचं सुरुच असते.पोपटलालची भूमिका अभिनेता श्याम पाठक (Shyam Pathak) करत आहे.

पोपटलाल नाही तर वयाच्या ४७ व्या वर्षीही तारक मेहताचा हा कलाकार आहे अविवाहीत
छोट्या पडद्यावर सर्वाधिक विनोदी मालिका कोणती तर ती आहे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma). ही मालिका आज घराघरात लोकप्रिय आहे. ही टीव्ही मालिका २००८ पासून प्रसारित होत असून आजही ती टीआरपीच्या शर्यतीत चांगल्या मालिकांना तगडी टक्कर देत असते. या कॉमेडी टीव्ही मालिकेत दिलीप जोशी जेठालालच्या भूमिकेत मुनमुन दत्ता बबिता जी आणि तनुज महाशब्दे मिस्टर अय्यरच्या भूमिकेत झळकत
आहेत. मालिकेतल्या सगळ्याच व्यक्तिरेखा आज तितक्याच लोकप्रिय बनल्या आहेत.
यात गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार मालिकेत लग्नासाठी उतावीळ असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र काही केल्या त्याचे लग्न होत नाही. पण त्याचे लग्नासाठी स्थळं शोधण्याचं सुरुच असते.पोपटलालची भूमिका अभिनेता श्याम पाठक (Shyam Pathak) करत आहे. खऱ्या आयुष्यात तो अविवाहित नाही तर विवाहित असून त्याला तीन मुले देखील आहेत. आज आपण अभिनेता तनुज महाशब्देबद्दल (Tanuj Mahashabde) काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी टीव्ही मालिकेत बबिता जी आणि मिस्टर अय्यर पती-पत्नीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहेत. टीव्हीवर अजब गजब वाटणारी ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जेठालाल बबिता जीवर प्रचंड प्रेम करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. बबिताजीला इम्प्रेस करण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचे आपण मिस्टर अय्यरला पाहातो.
तर दुसरेकडे मालिकेत असेही दाखवण्यात आले आहे की जेठालाल कधी कधी विचार करतात की मिस्टर अय्यर खूप भाग्यवान आहे,त कारण त्यांच्या आयुष्यात बबिता जी आहे. तुम्हाला माहिती आहे का ? तनुज महाशब्दे यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये पटकथा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
शोच्या निर्मात्यांनी मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता जीचे पती अय्यर यांच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली तेव्हा त्यांना स्वतःला धक्का बसला होता. एका मुलाखतीत तनुज महाशब्दे म्हणाले होते की, 'इतक्या सुंदर स्त्रीच्या जोडीदाराची भूमिका मी करणार आहे हे फक्त बाकीच्यांनाच नाही तर मी स्वतः पचवू शकलो नाही'.याला कारणाही तसे खासच आहे कारण तनुजने अद्याप खऱ्या आयुष्यात लग्न केलेले नाही आणि त्याचे वय 47 वर्षे आहे.