Tunisha Sharma Note: तुनिषाने आत्महत्या केलेल्या मेकअप रूममध्ये सापडला कागदाचा तुकडा, नेमकं काय लिहिलंय त्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:02 PM2022-12-29T17:02:06+5:302022-12-29T17:02:37+5:30

Tunisha Sharma Note: तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा एक्स- बॉयफ्रेन्ड शिजान खान याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे.

Note Recovered From Set Where TV Actor Tunisha Sharma Died Tunisha Sharma Case | Tunisha Sharma Note: तुनिषाने आत्महत्या केलेल्या मेकअप रूममध्ये सापडला कागदाचा तुकडा, नेमकं काय लिहिलंय त्यावर?

Tunisha Sharma Note: तुनिषाने आत्महत्या केलेल्या मेकअप रूममध्ये सापडला कागदाचा तुकडा, नेमकं काय लिहिलंय त्यावर?

googlenewsNext

Tunisha Sharma Case: अवघ्या 20 वर्षाची टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने  आत्महत्या करत जीवन संपवलं.‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ या मालिकेच्या सेटवरच गळफास घेतला. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा एक्स- बॉयफ्रेन्ड शिजान खान याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. होय, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी मालिकेच्या सेटवर एक कागदाचा तुकडा सापडला आहे. शिजान खानच्या सेटवरच्या मेकअप रूममधून हा कागदाचा तुकडा जप्त करण्यात आला आहे. याच मेकअप रूममध्ये तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली होती.

मेकअप रूममध्ये सापडलेला हा कागदाचा तुकडा म्हणजे एक नोट आहे. ‘He Is blessed to have me as a co-actor Woohooo ’ (माझ्यासारखी को-स्टार मिळाल्याने तो आनंदी आहे...), असं त्या कागदाच्या तुकड्यावर लिहिलेलं आहे. त्यावर तुनिषा व शिजान या दोघांची नावंही लिहिलेली आहेत. ही नोट तुनिषाने  कधी लिहिली होती? याचा  नेमका अर्थ काय? याचा तपास पोलिस सध्या करत आहेत.

 तुनिषा व शिजान हे दोघं ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ या मालिकेत लीड अ‍ॅक्टर्स होते. सेटवरच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र सुमारे 15 दिवसांपूर्वी शिजानने तुनिषासोबत ब्रेकअप केलं होतं. यामुळे तुनिषा निराश झाली होती.

पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी तुनिषाचा मृत्यू झाला, त्या दिवशी त्या तिने व शिजान दोघांनी एकत्र जेवण केलं होतं. त्या दोघांमध्ये 15 मिनिटं संभाषणही झालं होतं. यानंतर दोघंही रागात होते. शिजान रागारागात आपला सीन शूट करण्यासाठी निघून गेला तर तुनिषा ही त्या मेकअप रुममध्येच बसलेली होती. याचठिकाणी तिने गळफास घेतला.
  

Web Title: Note Recovered From Set Where TV Actor Tunisha Sharma Died Tunisha Sharma Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.