आता कपिल शर्माला ओळखणे झाले कठीण, कित्येक किलो वाढले वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 06:49 AM2018-06-21T06:49:00+5:302018-06-21T12:19:00+5:30

कपिल शर्मा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियापासून दूर आहे. द कपिल शर्मा हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडत होता. पण या ...

Now Kapil Sharma was able to identify the difficult, weight of several kilos | आता कपिल शर्माला ओळखणे झाले कठीण, कित्येक किलो वाढले वजन

आता कपिल शर्माला ओळखणे झाले कठीण, कित्येक किलो वाढले वजन

googlenewsNext
िल शर्मा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियापासून दूर आहे. द कपिल शर्मा हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडत होता. पण या कार्यक्रमाच्या टीमसोबत दुबईला विमानाने जात असताना कपिलने सुनील सोबत भांडणं झाले होते. कपिलने नशेत सुनीलला शिव्या दिल्या होत्या. त्यामुळे सुनीलने रागाच्या भरात हा कार्यक्रम सोडला होता. त्याच दरम्यान अली असगरने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. या सगळ्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी ढासळला. त्यातच कपिल सतत आजारी पडत असल्याने या कार्यक्रमाचे चित्रीकरण अनेकवेळा रद्द करावे लागले. 
काहीच दिवसांत फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा हा कपिलचा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाला प्रेक्षक डोक्यावर घेतील असे सगळ्यांना वाटत होते. पण या कार्यक्रमाला तितकासा चांगला टिआरपी मिळाला नाही. या कार्यक्रमाचा काहीच दिवसांत गाशा गुंडाळावा लागला. त्याच दरम्यान कपिलचा फिरंगी हा चित्रपट आला होता. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर आदळला. त्यानंतर कपिल प्रसार माध्यमांपासून दूर होता. कपिल सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह नव्हता. पण नुकतेच कपिलला मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. कपिल या फोटोंमध्ये खूपच वेगळा दिसत आहे. कपिलचे वजन प्रचंड वाढले असल्याचे या फोटोंमधून दिसून येत आहे. कपिलच्या डोळ्याखाली देखील काळी वर्तुळे दिसायला लागली आहेत. कपिल या फोटोत इतका वेगळा दिसत आहे की त्याला ओळखणे देखील कठीण होत आहे. 
कपिल शर्मा लवकरच छोट्या पडद्यावर परतणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. याविषयी त्याने ट्वीट करून नुकतेच सांगितले होते. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, मी लवकरच कमबॅक करणार असून सध्या लाइफ स्टालइमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. 
कपिलचे वजन वाढले असल्याचे त्याने देखील सोशल मीडियावर कबूल केले होते. त्याने त्याच्या फॅन्ससोबत सोशल मीडियावर बोलताना सांगितले होते की, मी लवकरच एका वेगळ्या रूपात तुमच्या भेटीस येणार असून प्रेक्षकांना माझे एक वेगळ्या रूपातील प्रोफाईल पिक्चर लवकरच पाहायला मिळेल. मी सध्या कामावर लक्ष केंद्रित करत असून लवकरच परतणार आहे. 

Also Read : ​सोहेल खानने शब्द पाळलाचं तर ‘या’ चित्रपटातून होऊ शकते कपिल शर्माची वापसी!

Web Title: Now Kapil Sharma was able to identify the difficult, weight of several kilos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.