आता तर लोक मला खराखुरा राजकारणी समजतातःराजीव निगम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 05:21 AM2018-03-14T05:21:29+5:302018-03-14T10:51:29+5:30
'हर शांख पे ऊल्लू बैठा है' ह्या आपल्या प्रकारच्या पहिल्याच राजकीय विडंबनाने थोड्यात दिवसांत आपले वलय निर्माण केले आहे. ...
' ;हर शांख पे ऊल्लू बैठा है' ह्या आपल्या प्रकारच्या पहिल्याच राजकीय विडंबनाने थोड्यात दिवसांत आपले वलय निर्माण केले आहे. ह्या शो ची संकल्पना आणि कॉन्टेन्ट यांमुळे कॉमेडीयन आणि अभिनेता राजीव निगम यांना बरेचदा चुकून खरा राजकारणी समजले जाते आणि ते जिथे कुठे जातात तिथे त्यांचा रूबाब असतो.ते म्हणतात,“माझ्या पेहरावामुळे कधीकधी लोक मला खरे मुख्यमंत्री समजतात.मला नमस्कार करतात आणि त्यांना माझ्यासोबत सेल्फीही घ्यायची असते.हे अटेंशन आवडते पण भ्रष्ट राजकारण्यासोबत लोकांना सेल्फी काढायला का आवडते हे मात्र मला कळत नाही.नुकतेच एका कॉलेज कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील समस्या,देशातील शिक्षणाची समस्या आणि अशा बऱ्याच बाबतीत माझ्याशी बोलायला सुरूवात केली. अशा तरूणांबद्दल मला अतिशय सहानुभूती आहे आणि आपल्या देशात बदल घडवून आणण्यासाठी त्यांना समर्थन द्यायला मला प्रेरणा मिळते.मग ते माझ्या शोमधून का असेना.”असं दिसतंय की आमचे सीएम चैतू लाल ऑफस्क्रीन बरंच काही हाताळतात. ह्या शो च्या माध्यमातून राजकीय विडंबनामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची आणि समाजातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्याची राजीव यांना आशा आहे.'हर शांख पे ऊल्लू बैठा है' ही कथा आहे भ्रष्ट राजकारणी चैतू लाल (राजीव निगम) यांची.ते एका काल्पनिक राज्याची नवनियुक्त मुख्यमंत्री असून ह्या ताकदीच्या आधारावर त्यांना स्वतःचै स्वप्ने पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी ते सामान्य माणसाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात.
टीव्हीवरील राजकीय विडंबनाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे आपल्याच चुकांवर हसण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे.‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही आगामी मालिका देशातील विद्यमान राजकीय स्थितीवर तिरकस भाष्य सादर करणार आहे.राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’या कार्यक्रमातील एक लोकप्रिय उमेदवार राजीव निगम हे या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याची भूमिका रंगविणार आहेत.टीव्हीवर राजकीय नेत्याची भूमिका रंगविण्यास उत्सुक झालेले राजीव निगम म्हणाले, “एक नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा मी नेहमीच आदर करतो. राजकीय उपहास हे माझं कार्यक्षेत्र असल्याने मला वाजपेयी यांच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. मी त्यांची भाषणं नेहमीच ऐकत आलो असून त्यांची नक्कल करण्याचाही प्रयत्न केला आहे.त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द प्रशंसनीय असून त्यांनी भारताला स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्र बाळगण्याचं समर्थन केलं होतं.तसंच आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी अनेक सुधारणा केल्या.आश्वासनं देऊन आपल्या कार्यकाळातच ती प्रत्यक्षात उतरविणार्या मोजक्या नेत्यांमध्ये वाजपेयी यांचा समावेश होतो.”प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यावर राजीव निगम यांचा भर असून त्यासाठी राजकीय उपहास हे माध्यम त्यांनी निवडले आहे.या भ्रष्ट नेत्यांच्या दृष्टीने आपले खिसे भरणं हे सर्वात प्राधान्याचं काम असून देशाचं हित हे सर्वात शेवटी येतं.आपल्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नसल्याचे सांगून राजीव निगम म्हणाले की तरीही राजकीय विडंबनातून देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती विनोदी पध्दतीने सादर करणे हे आपले ध्येय आहे.