आता या कारणामुळे कपिल शर्मा अडकलाय वादात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 05:32 PM2016-12-14T17:32:57+5:302016-12-14T18:07:37+5:30

कपिल शर्मा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. अलीकडे एका टिष्ट्वटने कपिल शर्माने  वाद ओढवून घेतला होता.आता पुन्हा एकदा कपिल ...

Now for this reason, Kapil Sharma stays in the lock-in? | आता या कारणामुळे कपिल शर्मा अडकलाय वादात?

आता या कारणामुळे कपिल शर्मा अडकलाय वादात?

googlenewsNext
िल शर्मा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. अलीकडे एका टिष्ट्वटने कपिल शर्माने  वाद ओढवून घेतला होता.आता पुन्हा एकदा कपिल शर्मा याच वादात फसताना दिसतोय. एन्वहायर्नमेंट प्रोटेक्शन अ‍ॅक्ट व एमआरटीपी अ‍ॅक्टअंतर्गत कपिलविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आपल्या वर्सोवा येथील कार्यालयासाठी अवैधरित्या वृक्षतोड केल्याचा आणि अवैध बांधकामाचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.   आधी कपिलने या आरोपाचा इन्कार केला होता. कुठलेही बेकायदेशीर काम केल्याचे त्याने नाकारले होते. पण आता हे प्रकरण कपिलच्या अंगलट येताना दिसतेय. वनविभागाच्या अधिकाºयांनी कपिल शर्माच्या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर त्याच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आयपीसीच्या कलम १५७ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत पाच वर्षे कारावासाची तरतूद आहे. कपिलवर चेंज आॅफ लँड रूल्स केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. या भागात विनापरवानगी रेजिडेंशियलला कमर्शिअल केले जाऊ शकत नाही.एमआरटीपी कायद्याअंतर्गत हा गुन्हा आहे. याअंतर्गत ३ वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
दोन महिन्यांपूर्वी कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिष्ट्वट करून खळबळ उडवून दिली होती. बीएमसीचे अधिकारी आपल्याला लाच मागत असल्याचा दावा कपिलने या टिष्ट्वटमधून केला होता. बीएमसीच्या एका अधिकाºयाने कामाच्या मोबदल्यात आपल्याला पाच लाख रुपए मागितल्याचे त्याने म्हटले होते. यानंतर बीएमसीने कपिलवर अवैध बांधकामाचा आरोप केला होता. कपिलच्या या टिष्ट्वटवर बरेच राजकारण झाले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

 

Web Title: Now for this reason, Kapil Sharma stays in the lock-in?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.