‘ओ माय गॉड!’ चित्रपटाचा दिग्दर्शक उमेश शुक्ला ‘खिचडी’त दिसणार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 06:34 AM2018-03-30T06:34:33+5:302018-03-30T12:04:33+5:30

‘स्टार प्लस’च्या सहकार्याने ‘हॅटस ऑफ प्रॉडक्शन्स’ हे ‘खिचडी’ ही विलक्षण गाजलेली कौटुंबिक विनोदी मालिका नव्या स्वरूपात सादर करीत असून ...

'O My God!', Director Umesh Shukla plays the guest artist in 'Khichadi'! | ‘ओ माय गॉड!’ चित्रपटाचा दिग्दर्शक उमेश शुक्ला ‘खिचडी’त दिसणार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत!

‘ओ माय गॉड!’ चित्रपटाचा दिग्दर्शक उमेश शुक्ला ‘खिचडी’त दिसणार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत!

googlenewsNext
्टार प्लस’च्या सहकार्याने ‘हॅटस ऑफ प्रॉडक्शन्स’ हे ‘खिचडी’ ही विलक्षण गाजलेली कौटुंबिक विनोदी मालिका नव्या स्वरूपात सादर करीत असून त्यामुळे विनोदाची नवी व्याख्या तयार होईल. या मालिकेतील पारेख कुटुंबियांचे सदस्य रंगविणाऱ्या प्रमुख कलाकारांना- अनंग देसाई, सुप्रिया पाठक, राजीव मेहता, वंदना पाठक आणि जमनादास मजिथिया यांना- नव्या आवृत्तीत मूळ भूमिकेत कायम राखण्यात आले आहे. ही मालिका अधिक खुमासदार बनविण्यासाठी ‘ओ माय गॉड’ चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला हे एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील. यात ते एका चित्रकाराची भूमिका रंगविणार असून त्यांना पारेख कुटुंबीय कसे हैराण करून सोडते आणि ते त्याला कसा प्रतिसाद देतात, याचे चित्रण केले असेल.

निर्मात्यांनी दिलेल्या माहिनुसार, उमेशला त्याच्या भागातील विनोदी प्रसंग इतके आवडले आहेत की त्याने आणखी काही भागांमध्येही सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. “पारेख कुटुंबियांना दर वेळी वेगवेगळ्या संकटात टाकले असता ते त्याला तोंड देताना आपल्या भोवतालच्या लोकांना कसे नाचवितात, हे दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जयश्री (वंदना पाठक) ही उमेशने काढलेल्या आपल्या आजोबांच्या चित्राला घोड्याचे चित्र समजते आणि त्यावर पारेख कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे हा चित्रकार पूर्ण वैतागून जातो,” असे आतिशने सांगितले. ही भूमिका रंगविण्यासाठी ‘टी सीरिज’चे रमेश तौरानी यांच्याकडेही विचारणा करण्यात आली होती, परंतु आपल्याला अभिनय करणे जमणार नाही, असे सांगून त्यांनी ती नाकारली.

खिचडीच्या चौथ्या आवृत्तीचे भाग एका तासाचे असून ते दर वीकेण्डला प्रसारित केले जातील. “आमच्या प्रेक्षकांनी या मालिकेवर विलक्षण प्रेम केलं होतं. इतकं की त्यामुळेच मला या मालिकेची नवी आवृत्ती त्यांच्यापुढे लवकरात लवकर सादर करावीशी वाटत होती. ही मालिका प्रथम ‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित झाली आणि आता पुन्हा त्याच वाहिनीवर आम्ही तिचं प्रसारण करणार आहोत. मात्र यावेळी खिचडीचं प्रसारण आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धा एकाच वेळी होत असल्या, तरी आम्ही हे आव्हान स्वीकारलं आहे,” असे या मालिकेचे सह-निर्माते आणि एक मालिकेतील कलाकार जे. डी. मजिथिया यांनी सांगितलं. उमेशशिवाय ‘खिचडी’च्या नव्या आवृत्तीत रेणुका शहाणे, देबिना बॉनर्जी, सरिता जोशी आणि दीपशिखा नागपाल हे नामवंत कलाकारही काही भागांमध्ये सहभागी होणार आहेत.

Web Title: 'O My God!', Director Umesh Shukla plays the guest artist in 'Khichadi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.