Diwali 2018: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना देणार हा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:19 PM2018-11-05T19:19:16+5:302018-11-05T19:19:58+5:30
सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये नेहमी विविध सामाजिक मुद्द्यावर भाष्य केले जाते.
सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये नेहमी विविध सामाजिक मुद्द्यावर भाष्य केले जाते. मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जातो. यंदा दिवाळीच्या विशेष भागात तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये रसिकांना एकतेचा संदेश मिळणार आहे.
यंदा गोकुळधामवासी मोठ्या धुमधामात दिवाळी साजरी करणार आहेत. यावर्षी तारक व अंजली यांनी सर्व गोकुळधाम वासियांना आपल्या घरी लक्ष्मीपूजनासाठी आमंत्रित केले आहे. पूजेनंतर सर्व जण कपाउंडमध्ये फुलबाजी पेटवतात व खूप मजामस्ती करतात. तसेच मिठाई वाटतात. संपूर्ण सोसायटी पूजेच्या निमित्ताने एकत्र येतात. अनेकतेमध्ये एकता असली पाहिजे. एकतेत खूप मोठे बळ असते, हे दर्शवण्याचा प्रयत्न मालिकेत करण्यात आला आहे.
दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मॅटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती मालिकेत येईल असे बोलले जात होते. 2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरी ती मालिकेत कमबॅक करेल असं बोललं जात होतं. नवरात्रीमध्ये मालिकेत कमबॅक करणार असे वृत्त काही दिवसांपुर्वी आले होते. पण असे झाले नाही. आतापर्यंत दिशा प्रेग्नेंसी आणि बाळामुळे शोपासून दूर होती. पण आता तिला आई होऊन 11 महिने झाले आहे. तिचे रिल लाइफपासून दूर राहण्याचे कारण तिचे पती असल्याचे बोलले जात आहे. दिशाचा पती मयूरच्या हस्तक्षेपामुळे ती मालिकेत कमबॅक करु शकत नसल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे तिचे चाहते खूप नाराज झाले आहेत.