जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाला पूरक जीवनशैली आत्मसात करण्याविषयी नेहा पेंडसे म्हणते....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:00 AM2021-06-05T09:00:00+5:302021-06-05T09:00:00+5:30

''सोप्‍या भाषेत सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे आपल्‍या जीवनशैली निवडींचा आसपासच्‍या विश्‍वावर होणारा परिणाम जाणून घेणे आणि सर्वांनी उत्तमपणे व जबाबदारपूर्वक जगण्‍यासाठी मार्ग शोधून काढणे.

On the occasion of World Environment Day, Neha Pendse says about adopting an environmentally friendly lifestyle .... | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाला पूरक जीवनशैली आत्मसात करण्याविषयी नेहा पेंडसे म्हणते....

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाला पूरक जीवनशैली आत्मसात करण्याविषयी नेहा पेंडसे म्हणते....

googlenewsNext

निसर्ग आपल्‍यासाठी घरासारखाच आहे.आपण निसर्गाची काळजी घेतो, तेव्‍हा निसर्ग देखील आपले संरक्षण करतो. पण स्‍वयंपाक, साफसफाई, प्रवास अशा आपल्‍या दैनंदिन कृतींचा पर्यावरणावर अनेक पद्धतीने परिणाम होतो. आपले जीवन काहीसे मंदावलेले असताना निसर्ग बहरले आहे. या काळाने आपल्‍याला महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे, ती म्‍हणजे नैसर्गिक विश्‍वाचे जतन करा. आपण गतकाळात परत जाऊ शकत नाही आणि म्‍हणूनच सस्टेनेबल राहणीमान अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर मर्यादित स्‍वरूपात करणे आणि हरित पद्धतींचा सर्वोत्तम पद्धतीने अवलंब करण्‍यासाठी योग्‍य निवड करणे.मालिका 'भाबीजी घर पर है'मधील महाराष्‍ट्रीयन मुलगी नेहा पेंडसे ऊर्फ अनिता भाभी सस्टेनेबल राहणीमानाविषयी आपले विचार सांगितले आहेत.

मालिका 'भाबीजी घर पर है'मधील नेहा पेंडसे ऊर्फ अनिता भाभी म्‍हणाली, ''सोप्‍या भाषेत सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे आपल्‍या जीवनशैली निवडींचा आसपासच्‍या विश्‍वावर होणारा परिणाम जाणून घेणे आणि सर्वांनी उत्तमपणे व जबाबदारपूर्वक जगण्‍यासाठी मार्ग शोधून काढणे. हरित पद्धतींचा अवलंब हा आपल्‍या भूमातेचे संवर्धन व संरक्षण करण्‍याचा उत्तम मार्ग आहे. यासंदर्भात मी प्‍लास्टिकचा वापर कमी केला आहे आणि त्‍याऐवजी माझ्या किराणा माल व इतर आवश्‍यकतांसाठी प्‍लास्टिक-मुक्‍त पर्यायांचा वापर करते. 

मी सोबत सुती किंवा तागाच्‍या पिशव्‍या घेऊन जाण्‍याची काळजी घेते. ऊर्जेसंदर्भात मी इन्‍कॅन्‍डेसण्‍ट लायटिंगऐवजी एलईडी लायटिंग किंवा सीएफएल बल्‍ब्सचा वापर करते, कारण हे दीर्घकाळापर्यंत टिकतात आणि ऊर्जेची बचत करतात. याव्‍यतिरिक्‍त मी नैसर्गिक प्रकाशाला देखील प्राधान्‍य देते, ज्‍यामुळे ऊर्जासंवर्धनामध्‍ये मदत होण्‍यासोबत काहीशा अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळण्‍यामध्‍ये देखील मदत होते. आपल्‍या रोजच्‍या सवयींमधील हे लहानसे बदल आपल्‍याला पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक बनवू शकतात आणि मोठे परिवर्तन घडून येऊ शकते.

Web Title: On the occasion of World Environment Day, Neha Pendse says about adopting an environmentally friendly lifestyle ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.