राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील कलाकारांची ऑफस्क्रीन धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 11:32 AM2017-12-13T11:32:22+5:302017-12-13T17:02:22+5:30

कलर्स मराठीवर नुकतीच सुरू झालेली राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका प्रेक्षकांना आवडत असून या मालिकेतील प्रेमची भूमिका साकारणारा ...

Offscreen dhamal fun of the cast of Radha Prem Rangi Rangali | राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील कलाकारांची ऑफस्क्रीन धमाल मस्ती

राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील कलाकारांची ऑफस्क्रीन धमाल मस्ती

googlenewsNext
र्स मराठीवर नुकतीच सुरू झालेली राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका प्रेक्षकांना आवडत असून या मालिकेतील प्रेमची भूमिका साकारणारा सचित पाटील याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. प्रेमचा मालिकेतील लुक, त्याचे चालणं, बोलणं सगळंच प्रेक्षकांना भावत आहे. मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना मालिकेमध्ये वेगवेगळ्या घटना बघायला मिळत आहेत. अन्विताचे गरोदर असणे, नंतर ते प्रेमला कळणे, मंडपातून अचानक विशालचे गायब होणे, राधाचे लग्न प्रेमबरोबर होणे या सगळ्याच घटनांनी मालिकेला एक वेगळीच कलाटणी दिली आहे. या घटनांनी प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवले आहे. हे सगळे होत असतानाच मालिकेमध्ये अजून एक ट्विस्ट आला आहे. दीपिकाने प्रेमला एक अट घातली असून कागदपत्रांवर प्रेमची स्वाक्षरी देखील घेतली आहे. आता ही अट काय आहे हे प्रेक्षकांना पुढील काही भागांमध्ये कळणार आहे. त्यानंतर मालिकेमध्ये काय काय होणार? अन्विताचे सत्य घरच्यांना कळणार का? राधा प्रेमचे मन कसे जिंकणार? प्रेम राधाच्या प्रेमात पडणार का? या दोघांमध्ये कोणत्या नात्याची सुरुवात होणार हे बघणे रंजक ठरणार आहे. 
राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका सुरू होऊन आता काही दिवस झाले असून या मालिकेतील कलाकारांची खूप चांगली गट्टी जमली आहे. हे कलाकार सध्या त्यांच्या घरापेक्षा या मालिकेच्या सेटवर अधिक काळ घालवत असल्याने त्यांच्यासाठी या मालिकेची टीम म्हणजे एक कुटुंबच बनले आहे. चित्रीकरणाच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ मिळाला की, मालिकेतील कलाकार भरपूर वेळ एकत्र घालवतात. सेटवर सेल्फी काढणे, गप्पा गोष्टी करणे या गोष्टी सुरूच असतात. तसेच वेगवेगळ्या विषयांवर कलाकारांमध्ये चर्चासत्र देखील रंगतं. असाच त्यांच्या मजा मस्तीचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कलाकारांमध्ये असलेले बॉन्डिंग दिसून येत आहे. प्रेम, राधा, श्रावणी काकू आणि दीपिका हे आपल्याला फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. या फोटोतून हे सगळे सेटवर किती धमाल मस्ती करतात हे दिसून येत आहे.

Also Read : ‘रसिक प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप महत्त्वाची’ - सचित पाटील   

Web Title: Offscreen dhamal fun of the cast of Radha Prem Rangi Rangali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.