Oh No Shocking!शिवाय देणार अनीकाला तलाक?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 05:05 PM2016-12-28T17:05:04+5:302016-12-28T17:20:18+5:30

वर्ष संपायला आले आहे मात्र तरीही इश्कबाज मालिकेचा ड्राम संपायचे नाव घेत नाही. नेहमीप्रमाणे यंदाही मालिकेत एक नवीन वळण ...

Oh No Shocking! Will Anaika divorce? | Oh No Shocking!शिवाय देणार अनीकाला तलाक?

Oh No Shocking!शिवाय देणार अनीकाला तलाक?

googlenewsNext
्ष संपायला आले आहे मात्र तरीही इश्कबाज मालिकेचा ड्राम संपायचे नाव घेत नाही. नेहमीप्रमाणे यंदाही मालिकेत एक नवीन वळण आले आहे.या आधी मालिकेत शिवाय आणि अनिका या दोघांची केमिस्ट्री सा-यांनीच पाहिली आहे. सतत शिवायच्या मागेमागे फिरणारी अनिकाचे शिवायसोबत थाटात लग्नही पार पडले. शिवायचे अनिका बरोबर लग्न करण्याची इच्छा नसतानाही त्याला हे लग्न करावे लागले इतकेच नाहीतर कुटुंबाच्या सांगण्यानुसार सगळ्या रितीरिवाजही फॉलो करतायेत. शिवायला या सगळ्या गोष्टी करण्यात काडीचाही रस नाहीये. मात्र तरीही मना विरोधात जाऊन त्याने त्याच्या आजीच्या सांगण्यावरून सा-या गोष्टी फॉलो केल्या आहेत. मात्र आता हा ड्रामा आणखीन एक मोठे वळण घेणार आहे. होय, नुकतेच लग्न झाले आहे आता कुठे या दोघांच्या संसाराला सुरूवात झालीय. मात्र आता प्रेक्षकांना लवकरच एक मोठा धक्का बसणार आहे, कारण अनिका ही प्रेग्नंट असल्याचे खोटा ड्रामा करत शिवायला फसवण्याचा प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे शिवाय अनिकाला तलाक देण्यासाठी अनिकाला सांगतोय. त्यामुळे अनिकाने प्रेग्नंट असल्याचे कट रचल्याचे स्पष्ट होतोय. आता  अवनी शिवायला तलाक देण्यासाठी राजी होते या गोष्टींचा येणा-या भागात उलगडा करण्यात येणार आहे. 

इतर मालिकांप्रमाणे इश्कबाज मालिकेतही वेगवेगळ्या गोष्टींमुळे ही मालिका रसिकांपर्यत पोहचण्यात यशस्वी ठरली आहे.वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा करत रसिकांचे भरघोस मनोरंजन होत असल्यामुळे मालिकेतील शिवाय,अवनी आणि ओबेरॉय कुटूंब आता कुठे रसिकांना आवडू लागले आहे. सरत्या वर्षात एक शॉकींग खुलासा झाल्यानंतर येणा-या नवीन वर्षातही हटके ट्रॅक मालिकेत दाखवले जाणार असल्याचे मालिकेच्या टीमने म्हटले आहे. 

Web Title: Oh No Shocking! Will Anaika divorce?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.