‘अलाद्दीन नाम तो सुना होगा’मध्ये ओमर आणि अम्मी आले एकमेकांसमोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 20:05 IST2019-04-19T20:05:00+5:302019-04-19T20:05:00+5:30
‘अलादीन: नाम तो सुना होगा’ने आपले जादूई जग आणि एका मागोमाग एक चकित करणारे सत्य समोर आणत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे

‘अलाद्दीन नाम तो सुना होगा’मध्ये ओमर आणि अम्मी आले एकमेकांसमोर
सोनी सबच्या ‘अलादीन: नाम तो सुना होगा’ने आपले जादूई जग आणि एका मागोमाग एक चकित करणारे सत्य समोर आणत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. आता जिनू (राशुल टंडन) दुष्ट झाला आहे आणि अलाद्दीन (सिद्धार्थ निगम) आणि यास्मिन (अवनीत कौर) त्याला आधीप्रमाणे चांगला बनविण्याचा प्रयत्न करत आहेत.
जिनू हा जफर (आमिर दळवी)च्या नियंत्रणात आहे आणि तो दुष्ट जिन बनला असल्याने तो आपला आधीचा आका अलाद्दीनला विसरला आहे. यामुळे अलाद्दीनचा हिरमोड होतो. पण तो आणि यास्मिन जिनूला आधीप्रमाणे बनवण्याच्या मिशनवर आहेत, ज्यामुळे ते एकमेकांच्या अधिक जवळ येतात. आणि या दोघांमध्ये प्रेमभावना निर्माण होते. तर दुसरीकडे अम्मी (स्मिता बन्सल)समोर एक मोठे गुपित उघड होणार आहे. ती थक्क होते, जेव्हा ती आणि ओमर (गिरीश सचदेव) एकमेकांसमोर येतात आणि तिला कळते की, तिचा पती जिवंत आहे. ओमर आणि अम्मीच्या या पहिल्या भेटीनंतर पुढे काय घडेल? हे मालिकेच्या आगामी भागात कळेल.
स्मिता बन्सल म्हणाल्या, अम्मी आतापर्यंत या गोष्टींपासून अनभिज्ञ होती की, तिचा पती हयात आहे आणि तो अचानक तिच्या समोर येणार आहे. आगामी एपिसोड प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवणार आहे की, या दोघांच्या भेटीनंतर पुढे काय घडेल.
गिरीश सचदेव म्हणाला, आपली पत्नी कोण आहे हे माहीत असूनही त्याला तिला भेटण्याची इच्छा नव्हती. तर मग हे दोघे एकमेकांसमोर आल्यानंतर काय होईल, हे पाहणे अत्यंत रोचक ठरणार आहे.