अक्षया देवधरच्या व्हिडीओवर होतोय कमेंट्सचा वर्षाव, कुणी म्हणतंय ब्युटीफुल, तर कुणी म्हणतंय स्टनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 16:41 IST2021-10-08T16:36:27+5:302021-10-08T16:41:30+5:30
अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी तिच्याशी निगडीत खास अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

अक्षया देवधरच्या व्हिडीओवर होतोय कमेंट्सचा वर्षाव, कुणी म्हणतंय ब्युटीफुल, तर कुणी म्हणतंय स्टनिंग
अभिनेत्री अक्षया देवधरने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून पाठक बाई म्हणून लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. मालिका संपली असली तरी आजही रसिकांसाठी अक्षया ही त्यांची पाठकबाईच आहे. चाहते तिला अक्षया तिच्या नावापेक्षा पाठकबाई म्हणूनच जास्त ओळखतात. सध्या ऑनस्क्रीन ती झळकत नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळते. अल्पावधीतच रसिकांची लाडकी अक्षया ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसायची तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.
सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.अक्षयाने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत. सध्या अक्षया देवधरचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
अक्षया देवधर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी तिच्याशी निगडीत खास अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. नुकताच अक्षयानं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओत ती खूप सुंदर दिसते आहे.अक्षयाच्या व्हिडीओवर चाहत्यांची अमाप पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत. तिच्या या फोटोवर सुंदर, स्टनिगं, ब्युटीफुल अशा कमेंट्स चाहते करत आहेत.नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास व्हिडीओतही पाहायला मिळत आहे.