OMG 20 किलो वजनाचे दागिने घालते ही अभिनेत्री,तर तयारीसाठी लागतात तीन तास!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 06:22 AM2017-02-21T06:22:32+5:302017-02-21T11:52:32+5:30
हिंदी मालिका आणि मराठी रंगभूमीवरील सर्वात हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून गणली जाणारी स्नेहा वाघ हिने आपल्या तरल अभिनयाने रसिकांची मने ...
ह ंदी मालिका आणि मराठी रंगभूमीवरील सर्वात हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून गणली जाणारी स्नेहा वाघ हिने आपल्या तरल अभिनयाने रसिकांची मने जिंकून घेतली आहेत. आता ‘लाईफ ओके’वरील ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या भव्य ऐतिहासिक मालिकेत रणजितसिंग यांची आई राज कौर यांच्या भूमिकेत आपल्या निर्दोष आणि सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी ती सिध्द होत आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी विख्यात असलेली ही अभिनेत्री आपल्या भूमिकेला वाहून घेते. भूमिकेला आपल्याकडून सर्वस्व देण्याकडे तिचा कल असतो आणि राज कौरच्या व्यक्तिरेखेत रुपांतरित होण्यास तिला रोज दोन-अडीच तास लागतात. यावरून तीकिती व्यावसायिक अभिनेत्री आहे, हेच दिसून येते. इतकेच नव्हे, तर या भूमिकेसाठी स्नेहाला जड कपडे आणि दागदागिने अंगावर चढवावे लागणार आहेत. तिच्या स्कर्टला इतके पदर आहेत, की त्या एकट्य़ा स्कर्टचेच वजन सहज 15 किलो असेल. तिच्या अंगावरील दागिने 200 वर्षांपूर्वीच्या छायाचित्रांवरून मुद्दाम तयार करण्यात आले आहेत आणि त्यात खडे आणि मोत्यांचा सढळ हस्ते वापर करण्यात आला आहे.“हो, मी प्रथमच इतके कपडे एकाच वेळी अंगावर घालणार असून त्यामुळे मला या भूमिकेसाठी तयार होण्यास बराच वेळ लागतो. माझ्या यापूर्वीच्या भूमिकेत मी झटपट तयार होत असे कारण त्यातील व्यक्तिरेखा आजच्या काळातील होत्या. पण मला राज कौरच्या रूपात रुपांतरित होण्यासाठी सहज अडीच-तीन तास जतात. केवळ, कपडे, दागिने आणि रंगभूषाच नव्हे, तर राज कौरच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक बारकावे स्पष्ट करण्यासाठी इतका वेळ लागतो. माझे कपडे राजेशाही आणि जड आहेत. पण ते पाहिल्यावर तुम्ही भूतकाळात जाल. अंगावरील प्रत्येक दागिन्याचा स्वतंत्र अर्थ आहे आणि ते मला पारंपरिक शीख रूप बहाल करतात. मला हे रूप खूपच आवडतं, कारण आजवर आपण असं व्यक्तिमत्त्वटीव्हीवर पाहिलेलंच नाही,” असे स्नेहा म्हणाली.