घनःश्याम आणि निक्कीमध्ये जोरदार वाद, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण-भावाच्या नात्यात मोठी फूट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 09:24 AM2024-08-19T09:24:07+5:302024-08-19T09:27:26+5:30
बिग बॉस मराठीच्या घरात आज रक्षाबंधनाच्या दिवशी निक्की आणि घनःश्याममध्ये मोठा वाद होताना दिसणार आहे (bigg boss marathi 5)
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आजपासून चौथा आठवडा सुरु झालाय. तीन आठवड्यात बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये चांगलाच कल्ला झाला. तीन आठवड्यात बिग बॉस मराठीमधून तीन स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. पुरुषोत्तम दादा पाटील, निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोघांना बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जावं लागलं. अशातच आज घरात नवीन राडा झालेला पाहायला मिळणार आहे. एकमेकांना भाऊ-बहिण मानणाऱ्या घनःश्याम आणि निक्कीमध्ये भांडण होताना दिसणार आहे.
निक्की आणि छोटा पुढारीमध्ये वाद
बिग बॉस मराठीचा नवीन आठवड्याचा प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत निक्की घनःश्यामला रागात बोलते की, "तू फेक आहे". पुढारीही तिला चिडून म्हणतो, "काय फेक वागलोय, सांग ना! तू किती होपलेस आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय. तुला मी सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला. नाही देत आता. निक्कूताई म्हटल्यामुळेच घात झाला ना." शेवटी निक्की त्याला म्हणते, "नको मानू मला बहीण. भाऊ-बहिणीच्या नात्यावर धब्बा आहे तू." अशाप्रकारे निक्की आणि छोटा पुढारीमध्ये वाद झाला. या वादाचं नेमकं कारण काय, हे आजच्या भागात पाहायला मिळेल.
बिग बॉसच्या घरात झालं डबल एविक्शन
काल बिग बॉस मराठीच्या घरात आज डबल एविक्शन झालं. गेल्या आठवड्यात निखिल दामले, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि योगिता चव्हाण हे चौघेजण नॉमिनेट होते. त्यापैकी निखिल आणि योगिताला काल घराबाहेर जावं लागलं. चौथ्या आठवड्यात घरात काय कल्ला पाहायला मिळणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच एकमेकांना भाऊ मानणाऱ्या निक्की - घनःश्याममध्ये वाद झाल्याने घरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे.