​एक था राजा एक थी राणी या मालिकेत सुरखा सिक्री यांचे पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 09:25 AM2017-03-15T09:25:05+5:302017-03-15T14:55:05+5:30

एक था राजा एक थी राणी या मालिकेच्या कथानकाला आता एक वेगळे वळण मिळणार आहे. या मालिकेत सुरेखा सिक्री ...

One was Raja Ek Rani, the return of Sura Sikri in this series | ​एक था राजा एक थी राणी या मालिकेत सुरखा सिक्री यांचे पुनरागमन

​एक था राजा एक थी राणी या मालिकेत सुरखा सिक्री यांचे पुनरागमन

googlenewsNext
था राजा एक थी राणी या मालिकेच्या कथानकाला आता एक वेगळे वळण मिळणार आहे. या मालिकेत सुरेखा सिक्री यांचे पुनरागमन होणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीला त्यांनी या मालिकेत राणी माँ ही भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. आता या मालिकेत सुरेखा सिक्री भूत म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकेत आता प्रेक्षकांना राणी माँचे भूत पाहायला मिळणार आहे. 
सुरेखा सिक्री यांच्या पुनरागमनाप्रमाणेच या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सुनीला करमकरची एंट्री होणार असून ती या मालिकेत विंध्यवासिनी ही भूमिका साकारणार आहे. या मालिकेत ती एका तांत्रिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही तांत्रिक लोकांमध्ये आणि आत्म्यांमध्ये संवाद साधण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करते. ती माध्यम बनून राजा आणि नैनाला राणी आणि राणी माँचा संदेश देणार आहे. याविषयी सुरेखा सिक्री सांगतात, "मी एक था राजा, एक थी राणी या मालिकेत परत येण्यासाठी खूप उत्सुक आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आता खूप सारी सरप्राईझेस मिळणार आहेत. राणी माँ जिवंत असताना त्यांनी नेहमीच राजा आणि राणीच्या आयुष्यात खलनायिकेची भूमिका बजावली आहे. मी मृत्युनंतरही त्या दोघांना त्रासच देणार आहे. प्रेक्षक मला पहिल्यांदाच भूताच्या भूमिकेत पाहाणार आहेत. मी माझ्या कारकिर्दीत कधीच भूताची भूमिका साकारली नसल्याने ही भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे." 
या मालिकेत सध्या इशा सिंगदेखील भूताच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. इशा या मालिकेत सध्या नैना आणि राणी अशा दुहेरी भूमिका साकारत आहे



Web Title: One was Raja Ek Rani, the return of Sura Sikri in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.