बाकी, चांगलं वागा! म्हणत मास्तरीण बाईने अधिपतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:19 AM2024-07-08T11:19:01+5:302024-07-08T11:19:53+5:30

Shivani Rangole And Hrishikesh Shelar : अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने इंस्टाग्रामवर ऋषिकेश शेलारसोबतचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Otherwise, be nice! Saying, Mastarin Bai Aka Shivani Rangole wished the Adhipati aka Hrishikesh Shelar a happy birthday | बाकी, चांगलं वागा! म्हणत मास्तरीण बाईने अधिपतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाकी, चांगलं वागा! म्हणत मास्तरीण बाईने अधिपतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changala Dhada)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. या मालिकेत मास्तरीणबाई आणि अधिपती यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.  या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हिने या मालिकेत अक्षरा नावाचं पात्र साकारलं आहे तर अभिनेता ऋषिकेश शेलार(Hrishikesh Shelar)ने अधिपतीची भूमिका निभावली आहे. आज ऋषिकेश शेलारचा वाढदिवस असून या निमित्ताने शिवानीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने इंस्टाग्रामवर ऋषिकेश शेलारसोबतचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा ऋषी. तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे असलेले काहीही आणि सर्वकाही असू द्या! तुमच्या मेहनतीचा, इच्छाशक्तीचा आणि मनाच्या चांगुलपणाचा अभिमान आहे! बाकी, चांगलं वागा! शिवानीच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या पोस्टवर ऋषिकेशनेदेखील कमेंट केलीय. त्याने लिहिले की, हाहाहा. आभारी आहे. 

वर्कफ्रंट
ऋषिकेश सांगलीमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालाय. त्याची आई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे. तर, वडील फार्मासिस्ट आहेत. ऋषिकेशला लहानपणापासून अभिनयाची आवड. त्यामुळे त्याने अनेक बालनाट्यांमध्ये काम केले. त्याला अभ्यासात फारशी गोडी नव्हती. मात्र, आई-वडिलांच्या सांगण्यावरुन त्याने एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतले. त्याने मुंबईत थिएटर आर्ट्स जॉईन केले. यातूनच त्याला शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक मिळालं. पुढे मालिकांमधून ऋषिकेशला अभिनयाची संधी मिळाली. पहिल्याच मालिकेतून तो विरोधी भूमिकेत झळकला होता. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून तो प्रकाशझोतात आला. या मालिकेत त्याने साकारलेला दौलत हे पात्र खूप गाजले. त्यानंतर आता तो तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
 

Web Title: Otherwise, be nice! Saying, Mastarin Bai Aka Shivani Rangole wished the Adhipati aka Hrishikesh Shelar a happy birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.