"नाहीतर एकटे पडाल...", 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 12:18 IST2024-05-15T12:18:04+5:302024-05-15T12:18:58+5:30
अक्षया नाईक (Akshaya Naik)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे.

"नाहीतर एकटे पडाल...", 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची पोस्ट चर्चेत
'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) घराघरात पोहचली. तिचे अनेक चाहते आहेत. अक्षयाने हिंदीतील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्येही भूमिका साकारली होती. नुकतेच अक्षयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने यशावर भाष्य केले.
अक्षया नाईक हिने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, यश म्हणजे नक्की काय ? चांगलं करिअर, चांगली नोकरी, खूप पैसा गाडी घर का ? आपल्याला यश म्हटल्यावर अनाहूतपणे करिअर हा विषय डोळ्यासमोर येतो. पण खरंच हे इतकंच आहे का ? आपण आपल्या नात्यांना का नाही तेवढं महत्त्त्व देत ? मग ती मैत्री असो व प्रेम ?
ती पुढे लिहिले की, आपण कधीच एखादया व्यक्तिच्या वैयक्तिक जीवनाच्या प्रोग्रेसला यश का नाही म्हणत ? का नेहमी “मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही कारण मला करियरवर कॉन्सेंटरेट करायचंय” असं म्हणून लोकं सोडून जातात ? मैत्रीत असं कोणी म्हणतं का ? कामाव्यतिरिक्त पण आयुष्य आहे हे विसरू नका, आणि तितकीच मेहनत तुमचं खाजगी जीवन सफल करण्यातदेखील घ्या. नाहीतर एकटे पडाल.
वर्कफ्रंट
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मराठीबरोबरच तिने हिंदी मालिकांमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षयाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.