ओव्हर अॅक्टिंगची दुकान, कुत्रा नाही चावला तुला, व्हॅक्सिनेशनचा फोटो टाकून ट्रोल झाली गोविंदाची भाची
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:55 PM2021-05-12T15:55:32+5:302021-05-12T15:59:41+5:30
आरती सिंगला सोशल मीडियावर वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातेय.
कोरोनाच्या दुसर्या लाटेविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. दररोज हजारो लोकांना कोरोना होतोय. हे टाळण्यासाठी, चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटींनी ही व्हॅक्सिन घेण्याचे आवाहन लोकांना करित आहेत. तसेच व्हॅक्सिन घेतानाचे स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करतायेत.
अलीकडेच अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम आरती सिंग (Arti Singh vaccination photos) ने कोरोनाची लस घेतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर (Arti Singh Instagram) शेअर केला आहे. आरती सिंगने लिहिले की, तिला इंजेक्शनची भीती वाटते पण आपल्याला याच्याशी लढण्याची गरज आहे. पहिला डोस घेतला.
यूजर्स म्हणाले- व्हॅक्सिन घेतले, कुत्रा नाही चावला
या फोटोमुळे आरती सिंगला वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातेय. या फोटोंसोबत आरती सिंगने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती व्हॅक्सिन घेताना खूर घाबरली आहे आणि रडताना दिसतेय. यामुळे लोक तिला ट्रोल करीत आहेत. काहीजण आरती सिंगला 'ओव्हर अॅक्टिंगची दुकान' तर काही जण 'नौटंकी' म्हणत आहेत.
एका यूजरने आरतीच्या फोटोवर कमेंट करताना लिहिले, 'आरती इंजेक्शन देताना दिसतायेत, कुत्रा चावत होता?, तर दुसऱ्या यूजरने लिहिले, टॅटू काढताना दुखले नाही का?, 'ओव्हर अॅक्टिंगची दुकान'.
आरती सिंग प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहिण आहे आणि प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची भाची आहे. सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय असते. आरतीने २००७ साली मायका या मालिकेतून कारकीर्दीची सुरूवात केली होती.