'हर शाख पे उल्लू बैठा है' मालिकेतून राजकीय परिस्थितीवर कोपरखळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 04:15 AM2018-02-05T04:15:51+5:302018-02-05T09:54:13+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही एक अगदीच वेगळ्या प्रकारची विनोदी मालिका आहे. त्यात भ्रष्ट आणि ...

The 'owl is sitting on every branch' | 'हर शाख पे उल्लू बैठा है' मालिकेतून राजकीय परिस्थितीवर कोपरखळी

'हर शाख पे उल्लू बैठा है' मालिकेतून राजकीय परिस्थितीवर कोपरखळी

googlenewsNext
्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही एक अगदीच वेगळ्या प्रकारची विनोदी मालिका आहे. त्यात भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याची कथा सांगितली आहे. या मालिकेत ज्येष्ठ विनोदी अभिनेता अश्विनी धीर याच्या सहकार्याने राजकीय परिस्थितीवर विनोदी टिप्पणी अपेक्षित आहे. सामान्य माणसाला भेडसावणार्‍या अडचणी आणि संकटांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या मालिकेत त्यावर तिरकस झोत टाकण्यात आला आहे.

या मालिकेचे स्वरूप आणि संकल्पना लक्षात घेता तिच्या प्रोमोंचा प्रारंभ केंद्रीय अर्थसंकल्पावरील भाष्याने करण्यात आला. मालिकेत प्रमुख भूमिका रंगविणाऱ्या राजीव निगम या अभिनेत्याने केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केली, “या अर्थसंकल्पानंतर टीव्ही आणि मोबाईल फोन महागणार आहेत. पण त्यांना त्याची कुठे फिकीर आहे! ते केवळ आपल्या मनातली गोष्टच सांगताहेत. या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्यामुळे सामान्य माणसाच्या पगारात वाढ झाली आहे, मग तो (सामान्य माणूस) केवळ राष्ट्रपती किंवा पंतप्रधानच असेना का! तरीही माझी पत्नी या अर्थसंकल्पावर खुश आहे, आणि ती खुश असेलच, कारण खर्च तर मलाच करावा लागणार आहे ना! खरं म्हणजे काल होतं खग्रास चंद्रग्रहण आणि आज होतं अर्थसंकल्पग्रहण. हा 18 वर्षाचा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे तोही आता तरूण झालाय- तो काहीही करू शकतो!”

राजीवने आतापर्यंत अनेक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला असून त्याने अनेक राजकीय उपहासात्मक लेखनही केले आहे. तो ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत एका भ्रष्ट नेत्याची भूमिका रंगविणार असून त्यात त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर झोत टाकण्यात आला आहे. या मालिकेचे विडंबनात्मक आणि परखड स्वरूप बघता, प्रेक्षकांना ही मालिका पाहताना नक्कीच गुदगुल्या होतील.

Web Title: The 'owl is sitting on every branch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.