'नमूने'च्या माध्यमातून पु. ल. देशपांडेंच्या कथा येणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 02:58 PM2018-07-18T14:58:27+5:302018-07-18T15:07:45+5:30

पु. ल. यांच्या भूमिकेत संजय मोने दिसणार आहेत.

P. L. Deshpande's story will come in small screens | 'नमूने'च्या माध्यमातून पु. ल. देशपांडेंच्या कथा येणार छोट्या पडद्यावर

'नमूने'च्या माध्यमातून पु. ल. देशपांडेंच्या कथा येणार छोट्या पडद्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रसिद्ध मराठी लेखक व विनोदवीर पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु. ल. यांच्या लघुकथांवर ही मालिका आधारलेली आहे. 

पारंपरिक कथांच्या पलीकडे जात सोनी सब वाहिनी 'नमूने' ही नवीन विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. प्रसिद्ध मराठी लेखक व विनोदवीर पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु. ल. यांच्या लघुकथांवर ही मालिका आधारलेली आहे. 


'नमुने' मालिकेची कथा निरंजनच्या आयुष्याभोवती फिरते. कुणाल कुमार याने निरंजनची भूमिका साकारली आहे. त्याचे आयुष्य आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये पिचलेला हा निरंजन आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीनेच बघतो, प्रत्येक टप्प्यावर त्याला खच दिसते, स्वभावतःच तो निराशावादी बनला आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध स्वभावाची त्याची पत्नी भैरवी (तोरल रासपुत्र) अत्यंत उत्साही, आनंदी असते आणि छोट्या छोट्या गोष्टींतसुद्धा ती आनंद शोधत असते. निरंजनला पु. ल. देशपांडेंच्या कथा वाचण्याची आवड आहे. एके दिवशी, वाईट गोष्टीतही आनंद शोधण्यात निरंजनला मदत करण्यासाठी स्वतः लेखक पु. ल. निरंजनपुढे जिवंत होतात. पु. लं.च्या भूमिकेत संजय मोने दिसणार आहेत. फरिदा दादी यांनी निरंजनच्या आईची भूमिका बजावली असून त्या आपल्या सुनेसह नेहमी हास्यविनोद करीत असतात. या सगळ्यात निरंजनची मुले काव्या (सलोनी दैनी) आणि ललित (आर्यन प्रजापती) यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. पु. ल. जिवंत होऊन आपल्या लेखनातल्या अन्य पात्रांसह, त्यांच्या विनोदबुद्धीच्या मदतीने निरंजनला नकारात्मकतेवर मात करण्यासाठी मदत करतात, तेव्हा या कथेला वेगळे वळण लागते. 


दशमी क्रिएशन्सचे नितीन वैद्य यांनी या मालिकेची निर्मिती केली असून स्वप्ना वाघमारे – जोशी आणि मनीश रायसिंग यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. या मालिकेत मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. जय सिंग यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.
याबाबत निर्माते नितीन वैद्य म्हणाले की, 'प्रसिद्ध मराठी लेखक पु. ल. देशपांडे यांची प्रसिद्ध कथापात्रे सोनी सब वाहिनीच्या छोट्या पडद्यावर जिवंत करताना आम्हाला खूप आनंद व अभिमान वाटतो आहे. प्रेक्षक स्वतःला जोडून घेऊ शकतील आणि प्रेरित होतील असे शो सादर करणे हे दशमी प्रोडक्शन्सचे ध्येय आहे.' 
'नमुने' मालिका २१ जुलैपासून सोनी सब वाहिनीवर सुरू होणार असून दर शनिवार, रविवारी रात्री नऊ वाजता प्रसारीत होणार आहे. 
 

Web Title: P. L. Deshpande's story will come in small screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.