'पारू' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:34 IST2025-02-20T18:34:18+5:302025-02-20T18:34:48+5:30

पारू फेम अभिनेत्रीने नुकतीच नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबाबत अभिनेत्रीने माहिती दिली आहे.

paaru fame actress shrutkirti sawant buys new tata car | 'पारू' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, शेअर केला व्हिडिओ

'पारू' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, शेअर केला व्हिडिओ

असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याकडे महागड्या गाड्या आहेत. केवळ बॉलिवूडच नाही तर कित्येक मराठी सेलिब्रिटीही आलिशान गाड्यांचे मालक आहेत. आता यात आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. पारू फेम अभिनेत्रीने नुकतीच नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबाबत अभिनेत्रीने माहिती दिली आहे. 

 'पारू' फेम अभिनेत्री श्रृतकिर्ती सावंत हिने आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. श्रृतकिर्ती हिने टाटा कंपनीची लाल रंगाची गाडी खरेदी केली आहे. अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत श्रृतकिर्ती ही गाडी खरेदी करण्यासाठी गेली होती. 

'पारू' मालिकेत श्रृतकिर्ती खलनायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती दामिनिची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीही मिळत आहे. श्रृतकिर्तीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'तुझ्या रुपाचं चांदनं', 'कारभारी लयभारी', 'जीवाची होतिया काहिली' या मालिकांमध्ये ती दिसली होती. 

Web Title: paaru fame actress shrutkirti sawant buys new tata car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.