पारूची पुष्पा स्टाइल! 'अंगारों सा...' गाण्यावर भन्नाट डान्स, प्रसाद आणि पूर्वानेही दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:09 PM2024-06-05T12:09:42+5:302024-06-05T12:10:09+5:30

'पारू' मालिकेतील कलाकारांना पुष्पा आणि श्रीवल्लीच्या 'अंगारों सा' या गाण्याची भुरळ पडली आहे. 'पारू' मालिकेतील कलाकारांनी यावर व्हिडिओ बनवला आहे.

paaru fame sharayu sonawane dance with prasad jawade and purva shinde on pushpa 2 angaro sa song | पारूची पुष्पा स्टाइल! 'अंगारों सा...' गाण्यावर भन्नाट डान्स, प्रसाद आणि पूर्वानेही दिली साथ

पारूची पुष्पा स्टाइल! 'अंगारों सा...' गाण्यावर भन्नाट डान्स, प्रसाद आणि पूर्वानेही दिली साथ

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २' सिनेमातील पुष्पा आणि श्रीवल्लीचं 'अंगारों से' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. प्रदर्शित होताच हे गाणं आणि गाण्याच्या हुक स्टेप व्हायरल झाल्या. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओही व्हायरल झाले. आता 'पारू' मालिकेतील मराठी कलाकारांना या गाण्याची भुरळ पडली आहे. 'पारू' मालिकेतील कलाकारांनी यावर व्हिडिओ बनवला आहे. 

झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच 'पारू' ही नवी कोरी मालिका सुरू झाली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे पारूच्या भूमिकेत आहे. तर प्रसाद जवादे आदित्य आणि पूर्वा शिंदे दिशाच्या भूमिकेत आहे. शरयू, प्रसाद आणि पूर्वाला 'पुष्पा २'मधील 'अंगारों सा' या गाण्याची भुरळ पडली आहे. या गाण्यावर त्यांनी रील व्हिडिओ बनवला आहे. शरयूने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

या व्हिडिओत शरयू प्रसाद आणि पूर्वासोबत 'अंगारों सा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 'अंगारों सा' गाण्याच्या हुकस्टेप्स ते या व्हिडिओत करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. "पुष्पाची पारू स्टाईल" असं कॅप्शन शरयूने या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

Web Title: paaru fame sharayu sonawane dance with prasad jawade and purva shinde on pushpa 2 angaro sa song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.