'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 10:07 AM2024-11-12T10:07:43+5:302024-11-12T10:08:16+5:30

झी मराठीवरील लोकप्रिय 'पारु' मालिकेत टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीची खलनायिका म्हणून एन्ट्री होणार आहे

paaru marathi serial actress shweta kharat seen in villain sharayu sonawane and prasad jawade | 'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका?

'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका?

झी मराठीवरील 'पारु' मालिकेची सध्या खूप चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात 'पारु' सिनेमाला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री शरयू सोनावणे या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेविषयी एक मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे टीव्ही इंडस्ट्रीतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

या अभिनेत्रीची होणार 'पारु' मालिकेत एन्ट्री

'पारु' मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न असलेले दिसत आहेत. मालिकेतील वेगळं कथानक प्रेक्षकांना आवडत आहे. आता या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरातची एन्ट्री होणार आहे. श्वेता या मालिकेत खलनायिका म्हणून पाहायला मिळणार आहे. श्वेताने याआधी झी मराठीवरीलच मन झालं बाजिंद मालिकेत अभिनय केला होता. या मालिकेत तिच्यासोबत बिग बॉस मराठी ५ फेम अभिनेता वैभव चव्हाण झळकला होता. त्यामुळे श्वेताला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यास तिचे चाहते उत्सुक असतील यात शंका नाही.

श्वेताला खलनायिकेच्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वांना उत्सुकता

'पारु' मालिकेच्या निमित्ताने श्वेता खरात पहिल्यांदाच खलनायिकेच्या रुपात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. श्वेताने याआधी मालिकेत मुख्य हिरोईनचं काम केलं. त्यामुळे खलनायिका म्हणून श्वेता 'पारु' मालिका कशी गाजवणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 'पारु' मालिकेविषयी सांगायचं तर या मालिकेत प्रसाद जवादे आणि शरयू सोनावणे या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

Web Title: paaru marathi serial actress shweta kharat seen in villain sharayu sonawane and prasad jawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.