'पारु' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती; घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:39 IST2025-02-23T13:39:12+5:302025-02-23T13:39:35+5:30
झी मराठीवरील 'पारु' मालिकेतील अभिनेत्रीने मेहनतीच्या जोरावर स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलंय (shweta kharat)

'पारु' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती; घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो केले शेअर
सध्या झी मराठीवरील 'पारु' (paaru) मालिका चांगलीच गाजतेय. याच मालिकेत अनुष्काची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरातने (shweta kharat) तिचं हक्काचं घर खरेदी केली आहे. श्वेता खरातने गृहप्रवेशाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्वेताने घर घेतल्याची गुड न्यूज समोर येताच अनेकांनी तिचं अभिनंदन केलंय. श्वेता खरात गेली अनेक वर्ष मालिका आणि टेलिव्हिजन विश्वात कार्यरत आहे. तिने घेतलेलं नवीन घर हे तिच्या मेहनतीचं फळ आहे.
श्वेता खरातने घेतलं नवीन घर
'मन झालं बाजिंद', 'राजा रानीची गं जोडी' अशा मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात. श्वेता खरातने सोशल मीडियावर नवीन घर घेतल्याचे फोटो शेअर केलेत. श्वेताचे आई, बाबा, भाऊ यांनी नवीन घर घेताच घरात पूजा केली. श्वेताच्या बाबांनी सर्वांसोबत गृहप्रवेश केला. श्वेताने घरात कुटुंबासोबत खास फोटोसेशन केलं. श्वेताने घर घेताच सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी तिचं अभिनंदन केलंय. गेली अनेक वर्ष श्वेता मालिकाविश्वात कार्यरत आहे. श्वेताने कुटुंबाच्या साथीने स्वतःच्या कष्टाने हक्काचं घर घेतलंय.
श्वेता खरातचं वर्कफ्रंट
श्वेता खरातच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने 'राजा रानीची गं जोडी' मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेतील श्वेताने साकारलेली छोटीशी भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेनंतर झी मराठीवरील 'मन झालं बाजिंद' मालिकेत श्वेताला प्रमुख भूमिका मिळाली. सध्या श्वेता झी मराठीवरील 'पारु' मालिकेत अभिनय करतेय. श्वेताच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतंय. हक्काचं घर घेतल्याने श्वेता सध्या स्वप्नपूर्तीचा आनंद घेत आहे.