"आता घुसून मारा..." दहशतवादी हल्ल्यावर सौरभ गोखलेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला "धर्माभिमान..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:58 IST2025-04-23T09:57:23+5:302025-04-23T09:58:54+5:30

मराठी अभिनेत्यानं दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याचं आवाहन केलं आहे.

Pahalgam Terrorist Attack Baisaran Vally Update Saurabh Gokhale Shared Post Angry Over Terrorists | "आता घुसून मारा..." दहशतवादी हल्ल्यावर सौरभ गोखलेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला "धर्माभिमान..."

"आता घुसून मारा..." दहशतवादी हल्ल्यावर सौरभ गोखलेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला "धर्माभिमान..."

Pahalgam Terror Attack: काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना मंगळवारी ( २२ एप्रिल ) घडली आहे. बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आलं आहे.या दहतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मराठी कलाकारांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.  सई ताम्हणकर, तेजश्री प्रधान, मेघा धाडे, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, वैभव तत्त्ववादी आणि सौरभ गोखले अशा अनेक कलाकारांनी या हल्ल्यासंदर्भात पोस्ट शेअर करत निषेध व्यक्त केला आहे. 

सौरभ गोखलेनेही पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्र निषेध(Saurabh Gokhale On Pahalgam Terrorist Attack Baisaran Vally) केला असून, "तो देश भिकेला लागला तरी सुधरणार नाही, आता घुसून मारा" असं म्हणत दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याचं आवाहन केलं आहे. पुढे सौरभनं लिहलं, "सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण तुमच्या मुलांना जरूर द्या. परंतु तुमच्या धर्मावर बोट ठेवून तुमच्यावर अत्याचार होत असेल तर ते बोट छाटायची हिंमत, ताकद आणि धर्माभिमानही त्याच्यात जागृत करा !!!! ही काळाची गरज आहे", असं त्याने म्हटलं. 

यासोबतच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला सरकारचे अपयश संबोधले आहे. तसेच दहशतवाद्यांची जात दरवेळेला एकच कशी असते? असंही तिनं म्हटलं. सई ताम्हणकर हिनेही  "काश्मीरमधील बातमीनं मन सुन्न झालं. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. निष्पाप बळी गेलेल्या जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली, हिंसाचार कधीही विजय व्हायला नको", अशी एक पोस्ट शेअर केली.

 सध्या दहशतवादी हल्ल्याचे मन हेलावून टाकणारे व्हिडीओ सध्या समोर येत आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार चालू आहेत. यातील काही नागरिक हे गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. शोध मोहीम संपल्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक पहलगाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Pahalgam Terrorist Attack Baisaran Vally Update Saurabh Gokhale Shared Post Angry Over Terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.