"मला ४ लग्न करण्याचा अधिकार आहे", बायकोसमोरच मुस्लिम अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य, दोन मुलांचा आहे बाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:29 IST2025-03-18T17:29:23+5:302025-03-18T17:29:43+5:30
एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीसमोरच धक्कादायक वक्तव्य केलं आहे. मला चार लग्न करण्याचा अधिकार आहे, असं वक्तव्य अभिनेत्याने केलं आहे.

"मला ४ लग्न करण्याचा अधिकार आहे", बायकोसमोरच मुस्लिम अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य, दोन मुलांचा आहे बाप
एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीसमोरच धक्कादायक वक्तव्य केलं आहे. मला चार लग्न करण्याचा अधिकार आहे, असं वक्तव्य अभिनेत्याने केलं आहे. या वक्तव्यामुळे अभिनेता चर्चेत आला आहे आणि त्याला चाहत्यांनी ट्रोलही केलं आहे. पाकिस्तानी अभिनेता दानिश तैमूरने हे वक्तव्य केलं आहे. एका लाइव्ह शो दरम्यान केलेल्या या वक्तव्यामुळे दानिशला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
दानिश आणि त्याची पत्नी आयजा खान हे पाकिस्तानी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल आहेत. नुकतंच त्यांनी एका लाइव्ह शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये दानिश म्हणाला, "हिच्यासमोर सांगतो आणि सगळ्यांसमोर सांगतो की मला ४ लग्न करण्याचा अधिकार आहे. मी लग्न करत नाहीये ती वेगळी गोष्ट आहे. पण, हा अधिकार मला खुद्द अल्लाहने दिला आहे. हा अधिकार माझ्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. पण, हे माझं प्रेम आहे. मी पत्नीचा आदर करतो. त्यामुळे सध्या तरी मला फक्त तिच्यासोबतच माझं आयुष्य घालवायचं आहे".
कोण आहे दानिश तैमुर?
दानिश तैमुर हा लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेता आहे. त्याने मॉडेलिंगमधून करिअरला सुरुवात केली होती. अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. कठपुतली, कुछ अनकही बाते, बंद खिडकियों के पीछे, इश्क है, कैसी तेरी खुदगर्जी, तेरी छांव मे, मन मस्त मलंग अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.
दानिशने ८ ऑगस्ट २०१४ रोजी आयजा खानशी निकाह केला. त्याआधी ते ६ वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांना दोन मुलंदेखील आहेत. दानिशने लाइव्ह शोदरम्यान केलेल्या या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.