'तारक मेहता...' च्या सोनूचा मेकर्सवर गंभीर आरोप, म्हणाली, "शो सोडत असल्याने मानसिक..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 09:47 AM2024-09-27T09:47:42+5:302024-09-27T09:48:20+5:30

पलकने मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली. शो सोडत असल्याचं सांगताच दिला गेला त्रास

Palak Sindhwani accuses Taarak Mehta Ka Ooltah Chashmah makers for mental harassment | 'तारक मेहता...' च्या सोनूचा मेकर्सवर गंभीर आरोप, म्हणाली, "शो सोडत असल्याने मानसिक..."

'तारक मेहता...' च्या सोनूचा मेकर्सवर गंभीर आरोप, म्हणाली, "शो सोडत असल्याने मानसिक..."

गेल्या वर्षभरापासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. मालिका सोडून गेलेल्या कलाकारांनी मेकर्स, निर्मात्यांवर गंभीर आरोप लावले. शैलेश लोढा, जेनिफर यांच्या आरोपांची तर खूप चर्चा झाली. आता मालिकेतील सोनू चं पात्र साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीने (Palak Sindhwani) सुद्धा मेकर्सवर आरोप लावत शो सोडला आहे. मेकर्सने तिला कॉन्ट्रॅक्ट तोडल्यामुळे कायदेशीर नोटीस पाठवली असून यावर पलकने मेकर्सवर उलट आरोप केले आहेत. नक्की प्रकरण काय?

मेकर्सचा आरोप काय?

काही दिवसांपूर्वीच पलक सिंधवानीला तारक मेहताच्या मेकर्सने कॉन्ट्रॅक्ट तोडल्याप्रकरणी नोटीस पाठवल्याची बातमी आली होती. मात्र पलकने हे खोटं असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता मालिकेच्या नीला फिल्म प्रोडक्शन्सने पलक सिंधवानीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पलकने कॉन्ट्रॅक्टमधील काही नियमांचं उल्लंघन केलं आहे ज्यामुळे प्रोडक्शनला नुकसान झालं असं नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. पलकने लिखित परवानगी नसतानाही मालिकेशिवाय इतर गोष्टींमध्येही सहभाग घेतला. तिला अनेकदा तोंडी आणि लेखी चेतावनी दिली गेली मात्र तरी तिच्याकडून पुढे तेच घडलं. हा कॉन्ट्रॅक्टमधील नियमांचा भंग आहे असं म्हणत नाईलाजाने मेकर्सला तिला कायदेशीर नोटीस पाठवावी लागली. 

अभिनेत्री पलक सिंधवानीचं उत्तर

यावर पलक सिंधवानीने उत्तर दिलं आहे. अभिनेत्रीच्या टीमने स्टेटमेंट जारी करत २०१९ पासूनची सर्व कहाणी सांगितली आहे. तसंच आता पलक शो सोडत असून ३० सप्टेंबर तिचा सेटवर शेवटचा दिवस असल्याचंही सांगण्यात आलं आहे. पलकच्या टीमच्या म्हणण्यांनुसार, पलकने कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. हे सर्व खोटं आहे. मेकर्स तिची प्रतिमा मलिन करण्याचा, तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.  तसंच पलकने मेकर्सवर मानसिक छळाचाही आरोप लावला आहे.  तिला पॅनिक अॅटॅक्स आले ज्यामुळे डॉक्टरांपर्यंत जावं लागलं असं ती म्हणाली.


पलकने २०१९ साली मालिकेत काम करायला सुरुवात केली. त्याच्या आधीपासूनच ती इतर जाहिराती, सीरिजमध्ये काम करत होती. मालिकेच्या मेकर्सने तिला ती हे सगळं करु शकते असं सुरुवातीला सांगितलं. मात्र तिला कॉन्ट्रॅक्ट वाचूच दिला नाही असा पलकचा आरोप आहे. ८ ऑगस्टला पलकने शो सोडत असल्याचं सांगितलं. यानंतर मेकर्सकडून तिला त्रास दिला गेला. तिचा मानसिक छळ केला गेला. तिचा राजीनामा लवकर न  स्वीकारता उलट आरोप लावले गेले. तिला सुट्टीही दिली गेली नाही. सेटवर पॅनिक अॅटॅक आला तरी तिला शूट करायला लावलं अशा प्रकारचा आरोप पलकने केला आहे.

Web Title: Palak Sindhwani accuses Taarak Mehta Ka Ooltah Chashmah makers for mental harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.