Shweta Tiwariच्या दोन अयशस्वी लग्नांवर लेक पलक तिवारीने सोडलं मौन, म्हणाली- चूक असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 02:37 PM2022-08-24T14:37:59+5:302022-08-24T15:33:33+5:30

Palak Tiwari Opened Up: पलक तिवारीने फार कमी वेळात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिने आई श्वेता तिवारीच्या दोन लग्नांबाबत मोकळेपणाने सांगितले.

Palak Tiwari opened up about her mother Shweta Tiwari's marriage and struggle | Shweta Tiwariच्या दोन अयशस्वी लग्नांवर लेक पलक तिवारीने सोडलं मौन, म्हणाली- चूक असेल तर...

Shweta Tiwariच्या दोन अयशस्वी लग्नांवर लेक पलक तिवारीने सोडलं मौन, म्हणाली- चूक असेल तर...

googlenewsNext

Palak Tiwari On Shweta Tiwari: टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी(Shweta Tiwari) ने तिच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता श्वेताची लाडकी लेक पलक तिवारी  (Palak Tiwari)बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान पलक तिवारी तिची आई श्वेताच्या संघर्षाबद्दल मोकळेपणाने सांगितले आणि सांगितले की तिला तिच्या आईकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने दोन लग्ने केली होती, मात्र तिचे एकही लग्न टिकू शकले नाही. श्वेताचे पहिले लग्न राजा चौधरी(Raja Chaudhary) सोबत झाले होते. लग्नाच्या वर्षभरानंतर पलकचा जन्म झाला.

2007 मध्ये श्वेता आणि राजाच्या नात्यातील कटुता सर्वांसमोर आली, त्यादरम्यान श्वेताने राजावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत  घटस्फोटाची मागणी केली. यानंतर 2013 मध्ये श्वेता तिवारीने अभिनव कोहली(Abhinav Kohli)सोबत लग्न केले. अभिनेत्रीचे दुसरं लग्न देखील 2019 मध्ये तुटलं. श्वेताने अभिनववर छेडछाडीचे आरोपही केले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान पलकने याबाबत बोलताना सांगितले की, लग्न करताना कोणतीही घाई करु नये असे मला वाटते. 


या सगळ्यासात महिलांना खूप संघर्ष करावा लागतो, पलक (Palak)म्हणाली की, तिने हे सर्व फक्त तिच्या आईसोबत घडतानाच पाहिलं नाही तर अनेक महिलांसोबत हे घडताना पाहिलं आहे. पलकने तिची आई श्वेताबद्दल पसरणाऱ्या विविध अफवांवर मोकळेपणाने सांगितले. पलक म्हणाली की, माझ्या आईचे प्राधान्य तिचे कुटुंब सुरक्षित ठेवणे आहे. त्यामुळे मी या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही. पुढे पलक म्हणाली, जर तुम्हाला वाटत असेल की ती व्यक्ती चुकीची आहे, तर त्याच वेळी त्याला सोडून द्यायला हवं.
 

Web Title: Palak Tiwari opened up about her mother Shweta Tiwari's marriage and struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.