आईच्या प्रेग्नंसीविषयी कळताच काय होती पलक तिवारीची प्रतिक्रिया, म्हणाली, "नाही...नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 10:48 AM2023-05-04T10:48:49+5:302023-05-04T10:49:43+5:30
पलक तिवारी सध्या अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे.
टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त प्रसिद्ध झाली. पहिलं लग्न मोडल्यानंतर मोडल्यानंतर श्वेताने चाळीशीत दुसरं लग्न केलं. तेही लग्न ९ वर्षांनी मोडलं. पहिल्या लग्नातून श्वेताला पलक (Palak Tiwari) ही मुलगी आहे तर दुसऱ्या लग्नातून तिने रेयांश या मुलाला जन्म दिला. आईच्या दुसऱ्या प्रेग्नंसीवेळी काय रिअॅक्शन होती याचा खुलासा पलकने नुकताच केला आहे.
पलक तिवारी सध्या अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे. म्युझिक अल्बममध्ये काम केल्यानंतर तिने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पलकचं सावत्र भाऊ रेयांशशी खास नातं आहे. तिचं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. पण आईच्या या दुसऱ्या प्रेग्नंसीवेळी पलकने नाही, नाही असं म्हणलं होतं.
फिल्म कंपॅनियनला मुलाखत देताना पलक म्हणाली,"आईच्या दुसऱ्या प्रेग्नंसीसाठी मी तयार नव्हते. मला असं वाटलं की जणू माझा आईसोबत कोणता कॉन्ट्रॅक्ट होता आणि तो तुटला. तेव्हा मी १५ वर्षांची होते. मी आईला मान डोलावत नाही ...नाही असं म्हणलं. तेव्हा आई म्हणाली, नाही म्हणजे काय? मी म्हणलं मला कोणीच सांगितलं नाही याबद्दल तेव्हा आई म्हणाली, तुझी ओव्हरअॅक्टिंग बंद कर."
पलक ही श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. राजा चौधरीसह घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताने एकटीने पलकचा सांभाळ केला. यानंतर श्वेताच्या आयुष्यात अभिनव कोहलीची एंट्री झाली. दोघांनी रेयांश हा मुलगा झाला. मात्र अभिनवसोबतही श्वेताचा घटस्फोट झाला. आता श्वेता सिंगल मदर आहे.