टीव्हीवरील 'वैदेही' झाली 40 वर्षांची, लूकमध्ये झालाय खूपच बदल, लेटेस्ट फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 18:40 IST2023-10-06T18:33:47+5:302023-10-06T18:40:56+5:30
'वैदेही'मध्ये आपल्या साधेपणाने आणि निरागसतेने मन जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचा लूक आता खूप बदलला आहे.

टीव्हीवरील 'वैदेही' झाली 40 वर्षांची, लूकमध्ये झालाय खूपच बदल, लेटेस्ट फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण
2001 आणि 2002 मध्ये टीव्हीवर प्रसारित झालेला 'क्या हादसा क्या हकीकत' ही मालिका तुम्हाला आठवतेय का?, 'क्या हादसा क्या हकीकत' मालिकेत नयोनिका बनून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री पल्लवी कुलकर्णी हिने अनके लोकप्रिय मालिकेत काम केलंय. ‘वैदेही’ मालिकेत मुख्य भूमिका साकारुन अभिनेत्री पल्लवी कुलकर्णी घराघरात पोहोचली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली.
'वैदेही'मध्ये आपल्या साधेपणाने आणि निरागसतेने मन जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचा लूक आता खूप बदलला आहे. टीव्हीवर साधीभोळी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. 'वैदेही' नंतर ही अभिनेत्री 'इतना करो ना मुझे प्यार' या मालिकेत दिसली होती. या मालिकेत पल्लवीसोबत प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय मुख्य भूमिकेत होता.
'इतना करो ना मुझे प्यार' नंतर पल्लवी कुलकर्णीने टीव्ही आणि अभिनयाच्या जगातून ब्रेक घेतला. टीव्हीपासून दूर असलेल्या या अभिनेत्रीला आता आठ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पल्लवी कुलकर्णी 2015 मध्ये ब्रेक घेतल्यानंतर 2021 मध्ये ओटीटीमधून परतली. 2021 मध्ये ही अभिनेत्री डिस्ने प्लस हॉटस्टारच्या शो '1962: द वॉर इन द हिल्स'मध्ये दिसली होती.
तिच्या कारकिर्दीत पल्लवीने भलेही निवडक मालिकांमध्ये काम केलं पण तिला खूप लोकप्रियता मिळवली. टीव्हीपासून दूर असलेली पल्लवी आजकाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.
या अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो पाहून चाहतेही तिला ओळखणं कठीण झालंय. पल्लवी कुलकर्णीचा लूक आता खूप बदलला आहे. अभिनेत्रीने तिच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, फिटनेसमुळे तिचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा खूप वाढला आहे.