पल्लवी पाटीलच्या बापमाणूस या मालिकेत झळकणार संग्राम समेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 11:06 AM2018-02-06T11:06:57+5:302018-02-06T16:36:57+5:30
बापमाणूस ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. या मालिकेत सुयश ...
ब पमाणूस ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. या मालिकेत सुयश टिळक, पल्लवी पाटील यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत आता एक नवी एंट्री होणार आहे. या मालिकेत लवकरच संग्राम समेळ प्रेक्षकांना एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि विशेष म्हणजे संग्राम हा खऱ्या आयुष्यात पल्लवी पाटीलचा पती असल्याने ही खऱ्या आयुष्यातील जोडी प्रेक्षकांना मालिकेत देखील पाहायला मिळणार आहे.
बापमाणूस या मालिकेत काम करण्यासाठी ते दोघे चांगलेच खूश आहेत. या मालिकेत संग्राम एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे कळतेय. या मालिकेत तो पल्लवीच्या नायकाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. पल्लवी आणि संग्राम यांनी एक डिसेंबर २०१६ ला लग्न केले होते. त्यांची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या प्रेमकथेविषयी सांगताना पल्लवीने सांगितले होते, "आम्ही दोघे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण आहोत. प्रत्येक समस्येत आम्ही दोघे एकमेकांच्या मागे उभे राहतो. एकदा सहज आम्ही भेटलो होतो. खरे तर त्यावेळी प्रेम, लग्न या गोष्टी आमच्या डोक्यातदेखील नव्हत्या. केवळ भेटून गप्पा मारूया... एकमेकांच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे हे शेअर करूया असे आम्ही ठरवले होते. पण त्यादिवशी आमच्या दोघांच्या डोक्यात काय घंटी वाजली हे आम्हाला दोघांनाही कळले नाही. आम्ही दोघे एकमेकांना आवडायला लागलो आहे असे वाटले. संग्राम लग्न करण्यासाठी मुली पाहातच होता. पण आम्ही दोघेही लग्न करण्याच्या विरोधात होतो. पण भेटल्यानंतर आपण दोघे एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतो याची आम्हाला जाणीव झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ही गोष्ट एकमेकांच्या घरात सांगितली आणि आठच दिवसांत आमचे लग्न ठरले. आम्ही हा निर्णय घ्यायला खूप वेळ लावला होता का असे आता आम्हाला वाटतेय. आम्ही दोघे एकमेकांसाठी खूपच परफेक्ट आहोत. एकमेकांचे गुण तर आम्हाला माहीत होते पण आता एकमेकांचे अवगुणही आम्ही स्वीकारले आहेत."
Also Read : प्रियांका चोप्रानंतर आता ही मराठमोळी अभिनेत्री दिसणार हॉलिवूडपटात