'जीजाजी छत पर है' मध्ये होणार पंचमच्या पत्नीची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 15:21 IST2019-02-25T15:13:07+5:302019-02-25T15:21:23+5:30
कुंभमेळ्यामध्ये जात असलेल्या ट्रेनमधील प्रवाशांची सुखरुप सुटका केल्यानंतर इलायची आणि पंचम यांच्या आयुष्यात एक भीतीदायक वळण येणार आहे. शोमध्ये पंचमची पत्नी फुतरीची एंट्री होणार आहे.

'जीजाजी छत पर है' मध्ये होणार पंचमच्या पत्नीची एंट्री
सोनी सब वाहिनीवरील 'जीजाजी छत पर है' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेचे लवकरच ३०० एपिसोड्स पूर्ण होणार आहेत. या मालिकेतील इलायची आणि पंचम या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या भूमिका साकारणारे हिबा नवाब आणि निखिल खुराना यांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता इलायची आणि पंचम यांच्या अनोख्या प्रेम कहाणीमध्ये एक आगळेवेगळे वळण येणार आहे.
कुंभमेळ्यामध्ये जात असलेल्या ट्रेनमधील प्रवाशांची सुखरुप सुटका केल्यानंतर इलायची आणि पंचम यांच्या आयुष्यात एक भीतीदायक वळण येणार आहे. शोमध्ये पंचमची पत्नी फुतरीची एंट्री होणार आहे. फुतरी आणि पंचम यांचे लहानपणीच लग्न झालेले असून या मालिकेत फुतरीची व्यक्तिरेखा राधिका मुथुकुमार साकारणार आहे. फुतरी आणि तिचे वडील चांदनी चौकात येणार असून फुतरी पंचमची पत्नी असल्याचा ते दावा करणार आहेत. ते फुतरीला पंचमसोबत राहण्याचा आग्रह करणार आहेत. आपले लहानपणी लग्न झाले याची कल्पना नसलेला पंचम याविषयी नानीला विचारणार असून ती सांगणार आहे की, लहानपणी त्याचे लग्न झाले होते. फुतरी आता पंचमसोबत राहाण्याचे ठरवणार आहे. पण यामुळे पंचम खूप घाबरला आहे आणि इलायचीला तो आपली मदत करायला सांगणार आहे. इलायची पंचमची मदत करेल का? तिला हे सत्य कळल्यानंतर ती त्याला सोडून देईल का? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मालिका पाहिल्यानंतरच मिळतील.
याविषयी फुतरीची भूमिका साकारणारी राधिका मुथुकुमार सांगते, जीजाजी छत पर है या मालिकेचा मी एक भाग होत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत असून या मालिकेचा हा नवा ट्रॅक देखील प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे. या सर्व कलाकारांसोबत काम करताना मला खूप मजा येत आहे.
या नव्या ट्रॅकविषयी पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा सांगतो, ''पंचमला अचानक माहीत पडते की, त्याचे लग्न तो पाळण्यात असतानाच झालेले आहे आणि त्यामुळे आता तो खूप घाबरला आहे. खोटी पत्नी पिंटू, आपले प्रेम इलायची आणि आपली लहानपणीची पत्नी फुतरी यांच्यामध्ये आता तो अडकला आहे. दर्शकांना त्याचा हा संघर्ष पाहताना खूपच मजा येणार आहे.