पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
By देवेंद्र जाधव | Updated: September 29, 2024 23:06 IST2024-09-29T23:01:57+5:302024-09-29T23:06:33+5:30
बिग बॉस मराठीमधून आज पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेला घराबाहेर जावं लागलं आहे (paddy kamble, bigg boss marathi 5)

पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज एलिमिनेशन झालं. फिनालेला काहीच दिवस बाकी असताना एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. हा स्पर्धक म्हणजे पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे. पॅडीचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला आहे. ६३ दिवस खेळून पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर गेले आहेत. या आठवड्यात घरातील आठही सदस्य नॉमिनेट होते. त्यापैकी पॅडी कांबळेचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपल्याने सर्वांनाच धक्का बसलाय.
पॅडी बिग बॉसमधून बाहेर
या आठवड्यात पॅडी कांबळेसोबत घरात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर असे आठ जण नॉमिनेट होते. त्यापैकी पॅडी कांबळेचा घरातील प्रवास संपला आहे. पॅडीच्या नावाची घोषणा होताच अंकिताला अश्रू अनावर झाले. याशिवाय पॅडीच्या ग्रुपमधील सर्वच सदस्य म्हणजेच धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत भावुक झालेले दिसले. सूरज आणि पॅडीचं मैत्रीपूर्ण नातं आपण पाहिलं. त्यामुळे पॅडी घराबाहेर गेल्यावर सर्वांचेच चेहरे पडले.
असा होता पॅडी कांबळेचा प्रवास
पॅडी कांबळे बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झाला. पॅडी पहिले दोन आठवडे एकदम शांत होता. त्यामुळे रितेशभाऊने त्याला चांगलंच सुनावलं. परंतु नंतर मात्र पॅडीच्या खेळात सुधारणा झाली. कालपर्यंत पॅडी घरातला एक सक्रीय सदस्य होता. पॅडीचा हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी कमालीची होती. पॅडीने अनेकदा एक ओळींच्या पंचचा टायमिंग साधून पॅडीने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. मला फळं द्या, हा पॅडीचा घरातील डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला. निक्की, जान्हवीने पॅडीला जोकर म्हणून हिणवलं होतं. परंतु पॅडीच्या संयमाचं रितेशभाऊंनी कौतुक करुन निक्की-जान्हवीला फैलावर घेतलं. प्रत्येक टास्कमध्ये पॅडीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या आठवड्यात पॅडीच्या दोन मुली त्याला भेटायला आल्या होत्या. फिनालेआधीच पॅडीचा बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रवास संपला आहे