Video: पॅडी कांबळेने केली अभिजीत सावंतची कमाल नक्कल, सर्व सदस्यांची हसून हसून पुरेवाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 10:16 AM2024-08-09T10:16:49+5:302024-08-09T10:17:19+5:30

पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळेने घरातील गायक अभिजीत सावंतची कमाल नक्कल केली आहे (abhijeet sawant. paddy kamble)

pandharinath paddy kamble doing mimicry of singer abhijieet sawant in bigg boss marathi 5 | Video: पॅडी कांबळेने केली अभिजीत सावंतची कमाल नक्कल, सर्व सदस्यांची हसून हसून पुरेवाट

Video: पॅडी कांबळेने केली अभिजीत सावंतची कमाल नक्कल, सर्व सदस्यांची हसून हसून पुरेवाट

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये या आठवड्यात सर्व सदस्यांमध्ये कल्ला टीव्ही हे कार्य सुरु आहे. या कार्यात घरातील सदस्यांना सर्वांसमोर परफॉर्मन्स करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी बिग बॉसने दोन टीम पाडल्या असून काल काही सदस्यांनी त्यांचा परफॉर्मन्स सर्वांना दाखवला. आज उर्वरीत सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात परफॉर्मन्स करणार आहेत. यामध्ये जास्त चर्चा आहे ती पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांच्या मिमिक्रीची. पॅडीने अभिजीत सावंतची कमाल मिमिक्री केलीय. 

पॅडीने अभिजीत सावंतची केली मिमिक्री

पंढरीनाथ कांबळे हा कलाकार बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर पॅडी या नावाने लोकप्रिय आहे. आज कल्ला टीव्ही कार्यात पॅडी कांबळेने अभिजीत सावंतची नक्कल केली. अभिजीत सदस्यांना समजावत असतो की आपल्याला गेममध्ये टिकून राहायचंय, पण मध्येच तो गाणं गायला लागतो. त्यामुळे तो इतरांना सांगतो की माझ्या गाण्याकडे लक्ष देऊ नका. खेळाकडे लक्ष केंद्रीत करा. अशाप्रकारे पॅडी अभिजीतची कमाल मिमिक्री करुन सर्वांना हसवतो. 


अभिजीतलाही आवडली पॅडीची मिमिक्री

पॅडी तुफान एनर्जीत अभिजीतची मिमिक्री करत होता. त्यावेळी सदस्यांची हसून हसून पुरेवाट झाली. इतकंच नव्हे तर स्वतःची मिमिक्री पाहून अभिजीतनेही पॅडीला टाळ्या वाजवत दाद दिली. पॅडी कांबळेने अभिजीतची मिमिक्री करुन कल्ला टीव्हीवर खरंच कल्ला केलेला दिसला. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी पॅडी कांबळे नॉमिनेटेड आहे. आता पॅडी या आठवड्यात घराबाहेर जाणार की सेफ होणार, हे पाहावं लागेल.

Web Title: pandharinath paddy kamble doing mimicry of singer abhijieet sawant in bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.