राजकारणातल्या दोन बहिणीसोबत बेधडक गप्पा 'अस्सल पाहुणे इसराल नमुने' कार्यक्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 08:30 PM2018-12-17T20:30:00+5:302018-12-17T20:30:00+5:30
कलर्स मराठीवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन बहिणी म्हणजेच पूनम महाजन आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत बेधडक गप्पा पाहायला मिळणार आहेत.
कलर्स मराठीवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन बहिणी म्हणजेच पूनम महाजन आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत बेधडक गप्पा पाहायला मिळणार आहेत. या दोघींनी देखील मकरंद अनासपुरे दिलखुलास संवाद साधला. काही उत्तरे एकदम बेधडक तर काही उत्तरे एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली आहेत. पंकजा आणि पूनमताई यांनी त्यांच्या वडिलांशी संबंधीत काही आठवणी सांगितल्या जे ऐकल्यावर सगळेच भावूक झाले.
कार्यक्रमामध्ये पूनम ताईंनी शबरीमलाबद्दल देखील आपली मते मांडली. त्या म्हणाल्या, 'विश्वास, धर्म यावर कशा पद्धतीने वाटचाली कराव्यात आणि कसे त्याला पुढे घेऊन जावे हे फार महत्वाचे असते. कोर्टाने ठरवले दरवाजे उघडे केले, जनतेने ठरवले दरवाजे बंद आहेत. सरकारला ठरवता येत नाही काय करावे केरळमध्ये ... भारत सुंदर लोकशाही असलेला देश आहे अनेक जाती, धर्म, भाषा आहेत आणि त्यामुळे निर्णय घ्यायला आणि बदल व्हायला वेळ लागतो.' तसेच काही प्रश्न देखील विचारले. पूनम ताईंना विचारले राहुल गांधी पंतप्रधान झाले तर ? पंकजा ताईना विचारले मुंडे साहेब असते तर ? यावर त्या म्हणाल्या “मी खूप वेगळी असते” तसेच काही म्हणी दिल्या त्या सांगितल्यावर कुठला राजकीय चेहरा समोर येतो हे सांगण्यास सांगितले. म्हणी होत्या, नाचता येईना अंगण वाकडं ? अंगापेक्षा भोंंगा जड ... यावर त्यांनी काय उत्तर दिले हे प्रेक्षकांना लवकरच कळेल...
चक्रव्यूह राउंड मध्ये काही राजकारणाशी संबंधीत माणसांबद्दल आवडणारी आणि खटकणारी गोष्ट देखील विचारली आहे. तर दोघींना कुछ कुछ होता है आणि शोले मधील संवाद देखील त्यांच्या अंदाजात म्हणायला सांगितले. इथेच ही धम्माल संपली नसून या दोघींना अजून काही प्रश्न देखील विचारले. राजकारणातला आवडता दादा कोण ? अजितदादा पवार की धनंजय मुंडे. संसदेत कोणाचे भाषण आवडते ? सुषमा स्वराज की स्मृती इराणी. भाजपा सोडून कुठला पक्ष आवडतो ? राष्ट्रीय काँग्रेस की मनसे ?
आता या प्रश्नांची उत्तर यांनी काय दिली हे जाणून घेण्यासाठी धमाकेदार भाग येत्या गुरु आणि शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर बघा.