लग्नाच्या पाच वर्षांनी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडपं झाले आईबाबा, अभिनेत्रीने जुळ्या मुलांना दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:40 PM2023-07-26T12:40:10+5:302023-07-26T12:40:44+5:30

पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे झाले आईबाबा, जुळ्या मुलांना दिला जन्म

pankuri avasthi and gautam rode beacome parents of twins blessed with baby girl and boy | लग्नाच्या पाच वर्षांनी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडपं झाले आईबाबा, अभिनेत्रीने जुळ्या मुलांना दिला जन्म

लग्नाच्या पाच वर्षांनी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडपं झाले आईबाबा, अभिनेत्रीने जुळ्या मुलांना दिला जन्म

googlenewsNext

पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे हे टीव्ही विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. २०१८ साली विवाहबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता लग्नाच्या पाच वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. पंखुरी अवस्थीने मंगळवारी(२५ जुलै) जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पंखुरी आणि गौतमला पुत्र आणि कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

एप्रिल महिन्यात पंखुरी आणि गौतमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईबाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. आता त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आईबाबा झाल्याची गुडन्यूज दिली आहे. गौतमी आणि पंखुरीने इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “आम्हाला कन्या आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे”, असं म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट करत अभिनंदन केलं आहे. मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने कमेंट करत पंखुरी आणि गौतमला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘बादल बरसा’ गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा डान्स, व्हिडिओ पाहून अविनाश नारकर म्हणाले "आग..."

“मी बहिरी नाहीये”, पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन ट्रोल, नेटकरी म्हणाले, “म्हणून अमिताभ बच्चन...”

पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांची पहिली भेट 'रजिया सुलतान' या टीव्ही शोच्या सेटवर झाली. २०१५ मध्ये 'सूर्यपुत्र कर्ण' या टीव्ही शोच्या सेटवर दोघे पुन्हा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. फेब्रुवारी २०१८मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या पाच वर्षांनंतर ते आईबाबा झाले आहेत.

Web Title: pankuri avasthi and gautam rode beacome parents of twins blessed with baby girl and boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.