बिग बॉस मराठी 2 मध्ये परागने रूपालीकडे कबूल केले त्याचे प्रेम, वाचा रूपालीने काय दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 05:34 PM2019-06-27T17:34:56+5:302019-06-27T17:36:04+5:30

बिग बॉस मराठीच्या घरात एक प्रेमकथा फुलणार असल्याचा अंदाज गेल्या कित्येक दिवसांपासून लावला जात आहे.

Parag Kanhere confesses love for rupali bhosale in bigg boss marathi 2 | बिग बॉस मराठी 2 मध्ये परागने रूपालीकडे कबूल केले त्याचे प्रेम, वाचा रूपालीने काय दिले उत्तर

बिग बॉस मराठी 2 मध्ये परागने रूपालीकडे कबूल केले त्याचे प्रेम, वाचा रूपालीने काय दिले उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देपराग बोलताना दिसत आहे की, ''रूपालीच्‍या तरूण मित्रांना, तिच्‍या फॉलोअर्सना, फॅन्‍सना आणि तिच्‍या मागे लागलेल्‍या प्रत्येकाला मला एक संदेश द्यायचा आहे की, प्रयत्‍न सुरू ठेवा, बट शी इज माइन, शी इन ओन्‍ली माइन!...''

'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. या कार्यक्रमात यंदाच्या आठवड्यात विद्याधर जोशी घराच्या बाहेर पडले असून सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहे. 

बिग बॉस मराठीमधील सगळ्या स्पर्धकांमध्ये आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात एक प्रेमकथा फुलणार असल्याचा अंदाज गेल्या कित्येक दिवसांपासून लावला जात आहे. पराग कान्हेरेच्या वागण्यातून, बोलण्यातून त्याला रूपाली आवडते असे प्रेक्षकांना वाटायला लागले होते. पण आता 'बिग बॉस' घरामध्‍ये प्रेमाचा अंकुर बहरला आहे. 

'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये पराग फॉलोअर्ससमोर अगदी प्रांजळपणे आपल्‍या भावना व्‍यक्‍त करताना दिसत आहे. पराग बोलताना दिसत आहे की, ''रूपालीच्‍या तरूण मित्रांना, तिच्‍या फॉलोअर्सना, फॅन्‍सना आणि तिच्‍या मागे लागलेल्‍या प्रत्येकाला मला एक संदेश द्यायचा आहे की, प्रयत्‍न सुरू ठेवा, बट शी इज माइन, शी इन ओन्‍ली माइन!...'' पराग हे सगळे रूपाली भोसलेच्या समोरच बोलत असून त्याचे बोलणे झाल्यावर रूपाली आपल्याला बोलताना दिसत आहे की, ''यस, बट अ‍ॅज ए वेरी गुड फ्रेण्‍ड!''  

रूपालीने परागला केवळ मित्र बोललेले बहुधा त्याला आवडलेले नाहीये आणि त्यामुळे तो आपले प्रयत्न सुरूच ठेवत आहे. पण रूपाली आपल्‍या मतावर ठाम राहत म्‍हणते की, ''पराग राव तुम्‍ही चुकताय! पण हा टकलू मित्र मला आवडतो, खूप आवडतो आणि हो, मी थोडीशी पझेसिव्‍ह होते त्‍याच्‍या बाबतीत इन फॅक्‍ट तोही होतो. कारण आम्‍ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, आम्‍ही एकमेकांसाठी खूप प्रोटेक्टिव्‍ह आहोत आणि एकमेकांची काळजी करतो. खूप प्‍युअर प्रेम आहे हे.'' 

आता हे प्रेम एकतर्फी आहे की ही प्रेमकथा बिग बॉसच्या घरात फुलते हे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Parag Kanhere confesses love for rupali bhosale in bigg boss marathi 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.