'माझी तुझी रेशीमगाठ 'मधील 'परांजपे'ची रिअल लाईफ पत्नी नेहा पेक्षाही दिसायला सुंदर, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 03:34 PM2021-12-18T15:34:07+5:302021-12-18T15:36:10+5:30
Majhi Tujhi Reshimgath मालिकेत परांजपेची भूमिका साकारली आहे अभिनेता चैतन्य चंद्रात्रेने. या मालिकेमुळे तो आज घराघरात प्रसिद्ध झाला आहे. मालिकेत नेगिटीव्ह शेडची भूमिका असली तरी याच मालिकेमुळे तो प्रकाशझोतात आला आहे.
छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ'(Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका रसिकांना चांगलीच भावली आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. यशची भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि नेहाची भूमिका साकारणारी प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) दोघांच्याही केमिस्ट्रीने रसिकांची पसंती मिळवली आहे. विशेष करुन नेहा साकारणारी प्रार्थना बेहरेचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला आहे. या दोघांव्यतिरिक्त 'परी' साकारणारी चिमुकली मायराही रसिकांची पसंती मिळवत आहे. याच बरोबर मालिकेतल्या इतर व्यक्तिरेखासुद्धा रसिकांच्या आवडीच्या बनल्या आहेत.
यांत सगळ्यात खाष्ट्य असलेली भूमिका पाहून चाहत्यांचा अक्षरक्षः संताप होतो. त्याविषयी फार काही सांगायला नको कारण ती व्यक्तिरेखा आहे परांजपेची वकिलाची. विशेष म्हणजे मालिकेत परांजपेची एन्ट्री प्रेक्षकांना मात्र मुळीच रुचली नव्हती. त्यामुळे सध्या मालिकेत नेहा आणि परांजपेचे लग्न ठरल्याचा ट्रॅक पाहायला मिळतोय. हा ट्रॅकसुद्धा रसिकांना अजिबात आवडलेला नाही. मात्र लवकरच परांजपेचे सत्य समोर येणार आणि नेहा आणि यशची जवळीक वाढणार असाच ट्रॅक पाहायला मिळणार आहे.
मालिकेत परांजपेची भूमिका साकारली आहे अभिनेता चैतन्य चंद्रात्रेने. या मालिकेमुळे तो आज घराघरात प्रसिद्ध झाला आहे. मालिकेत नेगिटीव्ह शेडची भूमिका असली तरी याच मालिकेमुळे तो प्रकाशझोतात आला आहे. विशेष म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेआधी तो ‘आभास हा’ या मालिकेतही झळकला होता. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आणि चैतन्यची या मालिकेत मुख्य भूमिका होती. या मालिकेव्यतिरिक्त ‘रुंजी’, ‘एका पेक्षा एक’, ‘व्याप कुणाचा ताप कुणाला’, ‘कुलवधू’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘एक तारा’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’, ‘फ्रेंड्स’, ‘गुलमोहर’ अशा चित्रपट आणि मालिकेतही तो झळकला आहे. मालिकाच नाहीतर काही सिनेमातही तो झळकला आहे.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास चैतन्यचे कुटुंबासोबतचे फोटो पाहायला मिळतात.यात त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटोही आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर कपल गोल देताना दिसतात.दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.