इंडियन आयडलमुळे परिणीती चोप्राचे झाले हे स्वप्न पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 06:00 IST2018-10-11T17:26:02+5:302018-10-13T06:00:00+5:30
परिणीती आणि अर्जुनने या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान प्रचंड मजा-मस्ती केली. अर्जुन आणि परिणीतीने चित्रीकरणादरम्यान स्पर्धकांसोबत ताल धरला.

इंडियन आयडलमुळे परिणीती चोप्राचे झाले हे स्वप्न पूर्ण
इंडियन आयडलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक हिट गाणी सादर करत आहेत. आता नऊच स्पर्धक बाकी असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळयांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. या आठवड्याला नमस्ते इंग्लंड या चित्रपटातील परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर हजेरी लावणार आहेत.
परिणीती आणि अर्जुनने या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान प्रचंड मजा-मस्ती केली. अर्जुन आणि परिणीतीने चित्रीकरणादरम्यान स्पर्धकांसोबत ताल धरला. तसेच खूप धमाल केली. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहून ते दोघेही थक्क झाले होते. या सगळ्याच स्पर्धकांचा आवाज खूपच चांगला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
इंडियन आयडलच्या स्पर्धकांपैकी एक असलेले अंकुश भारद्वाज आणि नीलंजना रे यांनी अर्जुन कपूरचे ‘में फिर भी तुमको चाहुंगा' हे गाणे म्हटले. अर्जुन आणि परिणीती यांना हे गाणे प्रचंड आवडले. त्या दोघांनी त्यांच्या आवाजाचे प्रचंड कौतुक केले. परिणीती कॉलेज मध्ये असल्यापासून इंडियन आयडल हा कार्यक्रम आवर्जून पाहते. तिने या कार्यक्रमाविषयी सांगितले, "बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा मी शिकत होते, तेव्हा मी इंडियन आयडलवर येण्याचे स्वप्न पहिले होते. त्या वेळी इंडियन आयडलचा पहिला सिझन सुरु होता आणि मला खरोखरच एकदा तरी ह्या स्टेज वर यायची इच्छा होती! तरीसुद्धा, त्या वेळी परिस्थिती वेगळी होती आणि मी माझ्या गायन पुढे चालू ठेऊ शकले नाही, पण आज मला इंडियन आयडलच्या सेटवर येण्याचे भाग्य लाभले आहे. थोड्या काळासाठी इंडियन आयडल 10 चा भाग बनणे छान वाटते आणि मला पाहिजे तितके गाणी मी गाऊ शकते! "
परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांना प्रेक्षकांना इंडियन आयडल 10 वर रविवारी रात्री 8 वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.