ऑनस्क्रीन रंगणा-या विवाहात भूमिका गुरुंगचे खरे पालक होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 05:51 AM2018-01-17T05:51:08+5:302018-01-17T11:21:08+5:30
'निम्की मुखिया’ मालिकेत सध्या शहनाईचे सूर गुंजत आहेत कारण मालिकेची नायिका निम्की (भूमिका गुरुंग) ही तिच्या स्वप्नीच्या राजकुमाराशी- म्हणजे ...
' ;निम्की मुखिया’ मालिकेत सध्या शहनाईचे सूर गुंजत आहेत कारण मालिकेची नायिका निम्की (भूमिका गुरुंग) ही तिच्या स्वप्नीच्या राजकुमाराशी- म्हणजे बब्बूसिंहशी विवाहबध्द होत आहे. हा विवाहसोहळा अतिशय भव्य आणि थाटात करण्यासाठी या वाहिनीने कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही.आपले लग्न व्हावे, इतकेच निम्कीचे स्वप्न असते आणि ते आता प्रत्यक्षात उतरणार असते.तिच्या विवाहाचा हा कथाभाग प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवील.भूमिका सांगते की तिच्या वास्तव जीवनात लग्नाला अद्याप अवकाश असून आपण सध्या या मालिकेतील लग्नाचा सोहळा मनापासून उपभोगीत आहोत.मालिकेतील या लग्नात भूमिकाचे खरे पालक मुद्दाम सहभागी होत असल्याची माहिती
सेटवरील एका खात्रीलायक सूत्राने दिली.त्यांना आपल्या मुलीला वधूच्या वेशात पाहण्याची खूप इच्छा असल्याने ते सेटवर भूमिकाचे लग्नाचे चित्रीकरण पाहात असतात.भूमिकाची आई ही भावनाप्रधान असून तिने वास्तव जीवनात लवकर लग्न करावे,अशी त्यांची इच्छा आहे.भूमिकालावधूच्या वेशात सजविण्यातही त्या मदत करतात आणि या लग्नाच्या कथाभागाचे चित्रीकरण पाहण्यासाठी सेटवर जास्तीत जास्त काळ व्यतीत करतात.आपले आई-वडील जवळच उपस्थित असताना आपण वधूच्या भूमिकेत राहात असल्यामुळे भूमिका स्वत:ला खूपच भाग्यवान समजते.
Also Read:आपल्या विवाहाच्या संगीत कार्यक्रमात निम्की लावणार या गाण्यावर ठुमके!
सध्या 'निम्की'च्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून हे लग्न भव्य प्रमाणावर साजरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.नुकताच निम्कीचा ‘हळदी समारंभ’ अतिशय थाटात पार पडला.त्यात स्वत: नवरी मुलीने म्हणजे निम्कीने केलेले डान्स पाहून रसिकही थिरकले असणार असाच होता. विशेष म्हणजे आपल्या विवाहाच्या संगीत सोहळ्यात निम्की 1990 च्या दशकातील सर्व प्रसिध्द लग्नाची गाण्यावर थिरकणारीही आहे. याच निमित्ताने सध्याचे पॉप आणि जॅझच्या दमान्यात जुन्या गाण्यांच्या आठवणींना ऊजाळा देण्याचा प्रयत्न निम्की करताना दिसणार आहे.जुन्या जमान्यातील गाणी आजही आपण ऐकतो.याच गाण्यांतून विवाहाशी संबंधित वधूच्या सर्व भावना व्यक्त होतात,असे तिचे मत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील ‘मेरे ख्वाबों में जो आए’ आणि अर्थातच ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यांवर ती बेधुंद होऊन थिरकणार आहे कारण एखाद्या भव्य लग्नाची सगळ्या भावना या गाण्यांतून व्यक्त होते असे निम्कीचे मत आहे.90 च्या दशकातील गाजलेल्या गाण्यांमुळे निम्कीचा संगीत कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.