पाठकबाईंच्या मराठमोळा साज श्रृंगाराने चाहत्यांना घातली मोहिनी, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 04:12 PM2020-03-19T16:12:04+5:302020-03-19T16:13:16+5:30

मराठमोळ्या गेटअपमधील अक्षया देवधरच्या फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

Pathakbai Aka Akshaya Deodhar shared traditional photos on Instagram | पाठकबाईंच्या मराठमोळा साज श्रृंगाराने चाहत्यांना घातली मोहिनी, पहा तिचे फोटो

पाठकबाईंच्या मराठमोळा साज श्रृंगाराने चाहत्यांना घातली मोहिनी, पहा तिचे फोटो

googlenewsNext

अभिनेत्री अक्षया देवधर हिची 'तुझ्यात जीव रंगला' ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली. 


अक्षया सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच अक्षयाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


या फोटोत ती मराठमोळ्या अंदाजात पहायला मिळते आहे. यात तिने पारंपारिक साज श्रृंगार केला आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना मोहिनी घालतो आहे. या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहे. तसंच या फोटोवर तिचे मित्र-मैत्रिणी आणि फॅन्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सुंदर आणि सालस अशा 'पाठक बाईंना' खऱ्या आयुष्यात पारंपारिकपणे तयार होऊन, दागिने घालून नटायची खूप आवड आहे.

अक्षया ही नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक पोशाख परिधान केलेले किंवा सुंदर नोझपिन आणि इतर अनेक छान व वेगळे दागिने घालून फोटो पोस्ट करते. अर्थातच छोट्याश्या दागिन्यामुळेदेखील अक्षयाचे सौंदर्य खुलून दिसते.

Web Title: Pathakbai Aka Akshaya Deodhar shared traditional photos on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.