सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म, मुलाचं नाव ठेवलंय खूप खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 09:35 IST2025-03-23T09:35:01+5:302025-03-23T09:35:27+5:30
पवित्र रिश्ता मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे (shruti kanwar)

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म, मुलाचं नाव ठेवलंय खूप खास
लग्नाच्या ८ महिन्यानंतर एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात नवीन पाहुणा आला आहे. ही अभिनेत्री म्हणजे म्हणजे श्रुती कंवर. 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली श्रुती कंवर (shruti kanwar) आई झाली. लग्नाच्या ८ महिन्यानंतर श्रुतीच्या आयुष्यात ही गुड न्यूज आली आहे. याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन श्रुतीने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे. श्रुतीने बाळाचं नावही खूप खास ठेवलं आहे.
श्रुतीने मुलाचं नाव ठेवलं खूप खास
जुलै २०२४ मध्ये श्रुतीने लग्न केलं. लग्नाच्या ८ महिन्यांनतर श्रुतीने मुलाला जन्म दिला आहे. "मुलाच्या जन्मामुळे आमचं हृदय प्रेमाने भारावून गेलंय." अशी पोस्ट करुन श्रुतीने ही खास गुड न्यूज सर्वांना सांगितली आहे. श्रुती आई झाल्याची खुशखबर कळताच चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलंय. श्रुतीने मुलाचं नाव ठेवलंय अशर. श्रुतीने ठेवलेल्या मुलाच्या नावाचा अर्थ खूपच युनिक आहे. अशर हा एक उर्दू शब्द असून आगमन किंवा आरंभ असा त्याचा अर्थ होतो.
जुलै २०२४ मध्ये श्रुतीने तिचा बॉयफ्रेंड अनिंद्य चक्रवर्तीसोबत लग्न केलं. १२ जुलै २०२४ मध्ये श्रुती आणि अनिंद्यने थाटामाटात एकमेकांशी विवाह केला. श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २१ ऑगस्ट १९९१ ला झारखंडमध्ये श्रुतीचा जन्म झाला. ३३ वर्षीय श्रुतीला 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेत तिने 'ओवी' ही भूमिका साकारली होती. याशिवाय 'डोली अरमानों की' आणि 'क्राईम पेट्रोल' यांसारख्या शोमध्ये श्रुतीने काम केलंय.